Nashik Corona | कोरोनाने 6 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्याही वाढली, जाणून घ्या आजचा अहवाल!

आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 45 हजार 983 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 13 हजार 450 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 1 हजार 398 ने घट झाली आहे.

Nashik Corona | कोरोनाने 6 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्याही वाढली, जाणून घ्या आजचा अहवाल!
Corona test
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 1:24 PM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) कोरोनाचा (Corona) कहर अजून सुरू असल्याचे दिसत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अहवालानुसार 1 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात कोरोनाने 6 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सोबतच नाशिक, निफाड, चांदवड, दिंडोरी, सिन्नरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 45 हजार 983 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 13 हजार 450 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 1 हजार 398 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 818 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

येथे आहेत रुग्ण

उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 744, बागलाण 262, चांदवड 322, देवळा 326, दिंडोरी 299, इगतपुरी 145, कळवण 198, मालेगाव 209, नांदगाव 215, निफाड 651, पेठ 117, सिन्नर 436, सुरगाणा 144, त्र्यंबकेश्वर 139, येवला 163 असे एकूण 4 हजार 370 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 8 हजार 584, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 229 तर जिल्ह्याबाहेरील 267 रुग्ण असून असे एकूण 13 हजार 450 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 68 हजार 251 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीणमध्ये आढळून आलेले बाधित

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 69, बागलाण 40 , चांदवड 29, देवळा 34, दिंडोरी 29, इगतपुरी 15, कळवण 28, मालेगाव 9, नांदगाव 82, निफाड 70, पेठ 15, सिन्नर 60, सुरगाणा 37, त्र्यंबकेश्वर 2, येवला 44 असे एकूण 563 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 95.02 टक्के, नाशिक शहरात 95.50 टक्के, मालेगावमध्ये 95.71 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण95.12 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 95.24 टक्के इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये आतापर्यंत कोरोनाने 4 हजार 270 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 60, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 362 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 818 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

1 फेब्रुवारी रोजी कळविलेले मृत्यू

– नाशिक मनपा- 03 – मालेगाव मनपा- 01 – नाशिक ग्रामीण- 02

नाशिक जिल्ह्याचे चित्र

– एकूण 4 लाख 68 हजार 251 कोरोनाबाधित. – 4 लाख 45 हजार 983 रुग्णांना डिस्चार्ज. – जिल्ह्यात उपचार 13 हजार 450 पॉझिटिव्ह रुग्ण. – जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.24 टक्के.

इतर बातम्याः

Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…

टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?

Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.