AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रकांतदादा यांच्या ‘हू इज धंगेकर?’ला ‘धीस इज धंगेकर’ने उत्तर… निवडणूक संपली, आता कसब्यात बॅनर वॉर सुरू

रवींद्र धंगेकर यांनी विजयी झाल्यानंतर आज भाजपचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. धंगेकर यांनी बापट यांचे आशीर्वाद घेत, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी बापट यांनी नियोजन कर आणि त्यानुसार काम कर. तू यशस्वी होशील.

चंद्रकांतदादा यांच्या 'हू इज धंगेकर?'ला 'धीस इज धंगेकर'ने उत्तर... निवडणूक संपली, आता कसब्यात बॅनर वॉर सुरू
ravindra dhangekarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 03, 2023 | 2:05 PM
Share

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमदेवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांची येथेच्छ खिल्ली उडवली होती. त्यांनी धंगेकर कोण आहेत? हु इज धंगेकर? असा सवाल केला होता. धंगेकर यांना ही टीका जिव्हारीही लागली होती. पण त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं नाही. कसब्यातील जनतेने धंगेकर यांच्या बाजूने कौल देताच आता कसब्यात बॅरन वॉर सुरू झालं आहे. या बॅनरमधून चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रश्नावर प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. थेट भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयाबाहेरच हे बॅनर्स लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपचे खासदार गिरीश बापटांच्या कार्यालयासमोरचं काँग्रेसने बॅनरबाजी केली आहे. गिरीश बापट यांचं हे मध्यवर्ती कार्यालय कसबा गणपतीसमोर समोर आहे. चंद्रकांत पाटलांनी विचारलेल्या हु इज धंगेकर? या प्रश्नाला धीस इज धंगेकर… असं उत्तर देण्यात आलं आहे. या बॅनर्सवर असा मजकूर लिहून चंद्रकांतदादा यांना जशास तसे उत्तर देण्यात आले असून चंद्रकांतदादांची खिल्लीही उडवण्यात आली आहे. बापटांच्या कार्यालयासमोरचं हा बॅनर लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

चंद्रकांतदादा म्हणाले…

मी गेल्या दहा बारा दिवसांपासून ऐकतोय. धंगेकर विरुद्ध रासने. अरे हु इज धंगेकर?, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. एका विराट सभेला संबोधित करताना त्यांनी हे विधा नकेलं होतं. त्यालाच आता काँग्रेसने बॅनर्स लावून उत्तर दिलं आहे.

नियोजन कर, यशस्वी होशील

दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी विजयी झाल्यानंतर आज भाजपचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. धंगेकर यांनी बापट यांचे आशीर्वाद घेत, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी बापट यांनी नियोजन कर आणि त्यानुसार काम कर. तू यशस्वी होशील. काही अडचण आली तर माझ्याकडे ये. मी तुला सल्ला देईन, असं बापट यांनी म्हटल्याचं धंगेकर यांनी सांगितलं. गिरीश बापट यांना मी निवडणुकीत भेटणार होतो. पण त्यांच्याविषयी संशयाची पाल चुकचुकायला नको म्हणून त्यांना भेटलो नाही. आता निवडणूक संपल्यानंतर त्यांची भेट घेतली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?