भाजप म्हणतं राष्ट्रवादीकडून पुणे मेट्रोचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न, आजितदादा म्हणाले “आता ट्रायल रनला पण भडकता की काय ?”

| Updated on: Aug 08, 2021 | 5:49 PM

साधेपणाने मर्यादित लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करायचा होता. म्हणून पुणे मेट्रोच्या ट्रायल रनचे उद्घाटन सकाळी सात वाजत झाले. ही फक्त ट्रायल रन होती. आता ट्रायलला पण भडकता की काय ?" असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना केला.

भाजप म्हणतं राष्ट्रवादीकडून पुणे मेट्रोचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न, आजितदादा म्हणाले आता ट्रायल रनला पण भडकता की काय ?
AJIT PAWAR
Follow us on

पुणे : “साधेपणाने मर्यादित लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करायचा होता. म्हणून पुणे मेट्रोच्या ट्रायल रनचे उद्घाटन सकाळी सात वाजत झाले. ही फक्त ट्रायल रन होती. आता ट्रायलला पण भडकता की काय ?” असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना केला. पुणे मेट्रोच्या ट्रायल रनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 7 ऑगस्ट रोजी हिरवा झेंडा दाखवला होता. त्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं, याच मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील तसेच मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. त्यानंतर अजित पवार यांनी वरील भाष्य केले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. (ajit pawar criticizes bjp and chandrakant patil on pune metro trial run inauguration)

आता ट्रायलला पण भडकता की काय ?

व्याऱ्यांची मागणी तसेच कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आज पुण्यातील निर्बंध शिथील करण्यात आले. या निर्बंधानुसार पुण्यात वेगळी नियमावली जाहीर करण्यात आली. या नियमावलीविषयी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. यावेळी पुण्याच्या मेट्रोविषयी बोलताना “प्रत्येकजण आपापलं काम करत असतो. ही फक्त ट्रायल रन होती. आता ट्रायलला पण भडकता की काय ? एकदा सुरुवात करायची होती. कार्यक्रम झाला की त्याला प्रसिद्धी मिळते. लोकांना कुठपर्यंत काम झालं त्याची माहिती मिळते. ते स्वत: व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होतेच. शहराचे प्रथम नागरिक होते. काही इतर आमदार होते. मर्यादित लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घ्यायचा होता. म्हणून तो सकाळी सातला ठेवला,” असे अजित पवार म्हणाले.

नेमकं प्रकरण काय आहे ?

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 30 जुलै रोजी पार पडले. सकाळी 7 वाजताच हा कार्यक्रम पार पडला. या उद्घाटन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पुणे मेट्रोचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 7 ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर मेट्रोची ट्रायल रन अजित पवारांच्या उपस्थितीत झाली असली तरी मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं जाईल असं भाजपचे स्थानिक नेते सांगत आहेत.

पुणे मेट्रोवरुन अमृता फडणवीस यांची टीका

दरम्यान, पुणे मेट्रोच्या प्रोजेक्टवरुन अमृता फडणवीस यांनी देखील राज्य सरकारवर 5 ऑगस्ट रोजी टीका केली. काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात, अशा शब्दात त्यांनी राज्य शासनावर निशाणा साधला.

इतर बातम्या :

पुणे मेट्रोच्या कामाचा वेग, संत तुकारामनगर स्टेशन 96 टक्के पूर्ण, लवकरच…

Ajit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना

(ajit pawar criticizes bjp and chandrakant patil on pune metro trial run inauguration)