पुणे मेट्रोच्या कामाचा वेग, संत तुकारामनगर स्टेशन 96 टक्के पूर्ण, लवकरच…

पुणे मेट्रोच्या (Pune Metro) कामाने वेग घेतला असून आतापर्यंत 45 % काम पूर्ण झाले आहे.

पुणे मेट्रोच्या कामाचा वेग, संत तुकारामनगर स्टेशन 96 टक्के पूर्ण, लवकरच...
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 6:00 PM

पुणे :    पुणे मेट्रोच्या (Pune Metro) कामाने वेग घेतला असून आतापर्यंत 45 % काम पूर्ण झाले आहे. पीसीएमसी ते स्वारगेट (PMC To Swargate) आणि वनाझ ते रामवाडी (Wanaz To Ramwadi) या दोन मार्गिकांमध्ये व्हायाडक्ट, स्टेशन आणि भूमिगत मार्गांची कामे प्रगतीपथावर चालू आहेत. तर पिंपरीमधल्या संत तुकाराम नगर इथल्या स्टेशनचं 96 टक्के काम पूर्ण झालंय. लवकरच या स्टेशनचे सेफ्टी ऑडिट होणार आहे.  (Pune Metro 96 percent work of Sant Tukaram Nagar station completed)

संत तुकाराम नगर स्टेशनच्या सेफ्टी ऑडिटसाठी दोन महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे. त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना पिंपरी ते फुगेवाडी हा प्रवास मेट्रोने करता येणार आहे. या मार्गावर नुकतीच चाचणी घेण्यात आली होती.

पुणे मेट्रोच्या वनाज व रेंज हिल्स येथील डेपो उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. पीसीएमसी ते संत तुकारामनगर (PMC To Santnagar) या 1 किमी मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. नववर्षात 3 जानेवारीला बरोबर एक वर्षांनी ही दुसरी चाचणी घेण्यात आली.  दुसऱ्या चाचणीसाठी पीसीएमसी ते फुगेवाडी (PMC To phugewadi) या साधारणतः 6 किमी मार्गावर मेट्रो ट्रेन धावली.

पीसीएमसी ते फुगेवाडी 6 किलोमीटर मार्गावर मेट्रो चाचणी पूर्ण

पीसीएमसी ते फुगेवाडी 6 किलोमीटर मार्गावर 3 जानेवारीला मेट्रो चाचणी पूर्ण करण्यात आली. पीसीएमसी ते फुगेवाडी (PMC To phugewadi) या साधारणतः 6 किमी मार्गावर मेट्रो ट्रेन धावली. कोरोना संसर्गामुळे 6 ते 7 महिने कामाचा वेग बाधित झाला. तरीदेखील हा महत्वपूर्ण टप्पा मेट्रोने आज पारित केला. दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी मेट्रो ट्रेन PCMC स्थानकावरून सुटली आणि दु 2 वा फुगेवाडी स्थानकावर पोहोचली.

या महत्वपूर्ण चाचणीसाठी मेट्रोचे कार्यकारी संचालक डी. डी. मिश्रा, मुख्य प्रकल्प अभियंता रवी कुमार, संदीप साकले, श्रीराम मांझी, राजा रमण, रवी टाटा या मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले. चेतन फडके या ट्रेन ऑपरेटरने चाचणीवेळी ट्रेन चालविली.

पुणे मेट्रोचे काम पूर्ण वेळेत करण्यासाठी हा एक महत्वाचा टप्पा आहे. या चाचणीसाठी 3 कोच लांबीची मेट्रो ट्रेन वापरण्यात आली. महामेट्रोचे तांत्रिक कुशल कामगार या चाचणीसाठी अनेक दिवसांपासुन झटत होते. पुणे मेट्रोने रिसर्च, डिझाइन स्टँडर्डाजाइजेशन (RDSO), कमिशनवर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (CMRS) आणि रेल्वे बोर्ड यांच्याकडे आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी अर्ज केला असून चाचणीची पुर्तता महामेट्रोने पूर्ण केली आहे.

(Pune Metro 96 percent work of Sant Tukaram Nagar station completed)

हे ही वाचा

पुणे महामेट्रोने केलेल्या अथक प्रयत्नाचे फळ, पीसीएमसी ते फुगेवाडी 6 किलोमीटर मार्गावर मेट्रो चाचणी पूर्ण

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.