Ajit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो (वनाज), शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे पाहणी करुन मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला.

Ajit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा पहाटे मेट्रोचं काम पाहण्यासाठी पोहोचले (Ajit Pawar Reviewed Pune Metro). अजित पवारांनी आज (25 सप्टेंबर) पहाटे सहा वाजता पुणे स्टेशन येथे जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मेट्रोचं काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी यंत्रणेला दिल्या. गेल्या आठ दिवसांत अजित पवारांनी दुसऱ्यांदा पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली आहे (Ajit Pawar Reviewed Pune Metro).

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो (वनाज), शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे पाहणी करुन मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या सुरु असलेल्या कामाबाबत सविस्तर माहीती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथे मॉडेल ट्रेनने प्रवास केला. शिवाजीनगर येथे बोगदा काम, व्हील पार्क येथील कचरा डेपोचे अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. येथील कामाचीही उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली. मेट्रोच्या रेणू गेरा यांनी या मेट्रो डेपो उभारणीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते (Ajit Pawar Reviewed Pune Metro).

यापूर्वी 18 सप्टेंबरलाही अजित पवारांनी पहाटे-पहाटे पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी मेट्रोने संत तुकाराम नगर ते एचए कंपनीपर्यंत प्रवासही केला होता.

अजित पवार वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. अजितदादांचा दिवस लवकर उगवतो. त्यामुळे अनेक वेळा ते बैठकांसाठी नियोजित वेळी, किंबहुना त्याआधीच पोहोचतात.

Ajit Pawar Reviewed Pune Metro

संबंधित बातम्या :

आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला, अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Published On - 10:04 am, Fri, 25 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI