AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget 2022: अजित पवारांनी अर्थसंकल्पात ‘पुणे मेट्रो लाइन 3’ बद्दल सांगितली महत्त्वाची माहिती

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कपासून शिवाजीनगरला जोडणाऱ्या “पुणे मेट्रो लाइन 3” प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. या उन्नतमार्ग मेट्रोची लांबी 23 कि.मी. असून प्रकल्पाची एकूण किंमत  8 हजार 313 कोटी रुपये आहे. पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गावर मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे.

Maharashtra Budget 2022:  अजित पवारांनी अर्थसंकल्पात 'पुणे मेट्रो लाइन 3' बद्दल सांगितली महत्त्वाची  माहिती
अजित पवारांनी मेट्रो बाबत दिली माहीती
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Mar 11, 2022 | 6:07 PM
Share

पुणे – शहरात वेगवान वाहतूक निर्मितीसाठी मेट्रो प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले. उदघाटनानंतर मेट्रो (Metro) सर्वसामान्य नागरिकांना प्रवासासाठी खुली करण्यात आली आहे. 12 किमी मार्गिकेवर पुणे आणि पिंपरीतील (Pune and Pimpri) दोन्ही मार्गिकांवर मेट्रोची सेवा नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यानंतर आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी मेट्रोच्या पुढील प्रास्तवित प्रकल्पाबद्दल माहिती दिली आहे.

पुणे मेट्रो लाइन 3

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कपासून शिवाजीनगरला जोडणाऱ्या “पुणे मेट्रो लाइन 3” प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. या उन्नतमार्ग मेट्रोची लांबी 23 कि.मी. असून प्रकल्पाची एकूण किंमत  8 हजार 313 कोटी रुपये आहे. पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गावर मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे. पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी, खडकवासला ते स्वारगेट या जोड मार्गिकांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

मेट्रोची क्षमता

सद्यस्थितीला पुणे व पिंपरी चिंचवड येथे मेट्रोचे प्रत्येकी तीन- तीन डब्बे आहेत. यामध्ये एका डब्यात 325 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. एका वेळी तब्बल 975 प्रवासी प्रवास करू शकतात. यामध्ये एक डबा महिलांसाठी राखीव आहे. आतापर्यत एक लाखाहून अधिक प्रवाश्यांनी मेट्रोतून प्रवास केला आहे.

Maharashtra Budget 2022 : पंचसूत्री कार्यक्रमात उद्योग क्षेत्रात भरीव तरतूद, मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत 1 लाख 89 कोटींची गुंतवणूक

PHOTO | बुलडाण्यात सवर्णा फाट्यावर विचित्र अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

CBSE : दहावी बारावी संदर्भात सीबीएसईकडून मोठी घोषणा, दुसऱ्या टर्म परीक्षेच्या तारखा जाहीर

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल