AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो अन् मोदींना बोललो की..’; अजितदादांनी भर सभेत सांगितला तो किस्सा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील चाकणमधील सभेत एक खास किस्सा सांगितला. एकनाथ शिंदे भाषणासाठी गेल्यावर त्यांच्या खुर्चीवर जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट त्या प्रश्नाबाबत सांगितल्याचं पवरांनी भर सभेत सांगितलं.

'मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो अन् मोदींना बोललो की..'; अजितदादांनी भर सभेत सांगितला तो किस्सा
| Updated on: May 11, 2024 | 6:21 PM
Share

लोकसभा निवडणुकासाठ चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या दोन दिवसांनी म्हणजेच 13  मेल ला पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची शिरूर लोकसभा  मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ चाकणमध्ये सभा झाली. या सभेमध्ये अजित पवारांनी एक खास किस्सा सांगितला.

अजित पवार मोदींना नेमकं काय म्हणाले?

कांद्याचा भाव हा मोठा प्रश्न आहे. पंतप्रधान पुण्यात आले होते. त्यावेळी कमी वेळ असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर मोदींची आणि मग उपमुख्यमत्र्यांचं भाषण होणार होतं. मुख्यमंत्री शिंदे भाषणासाठी गेल्यावर मी त्यांच्या खुर्चीव जाऊन बसलो. त्यावेळी मोदींना सांगितलं की, आपल्याकडे वातावरण चांगलं पण आपला शेतकरी नाराज आहे. कारण कांदा निर्यात बंदी केली. शेतकरी लोकांचं दुखणं समजून घेतलं पाहिजे असं मी त्यांना सांगितलं. आता निर्यात बंदी उठली आहे. अशी वेळ पुन्हा तुमच्यावर हा शेतकऱ्याचा पोरगा तुमच्यावर येऊ देणार नाही हा शब्द असल्याचं अजित पवार म्हणाले.

पाच वर्षांपूर्वी मी चूक केली ती सुधारा- अजित पवार

पाच वर्षांपूर्वी मी चूक केली की अमोल कोल्हेंना माझ्या घरी बोलून त्यांचा पक्षप्रवेश करून त्यांना उमेदवारी दिली. मला वाटलं होतं की ते माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतील. मी चुकलो मला ती चूक मान्य मी आताशी ठरलो आता चूक सुधारा आणि आढळराव पाटलांना निवडून द्या. आढळराव पाटलांना लीड द्या, वेळ कमी आहे. या भागातले सगळे प्रश्न सुटतील. सगळे एकत्र बसून मार्ग काढू. मी अर्थमंत्री निधी देऊन काम मार्गी लावू माझं शब्द आहे. मी पालकमंत्री सगळ्या 13 तालुक्याची जबाबदारी मी पार पडणार असल्याचं अजित यांनी सांगितलं.

निलेश लंकेनंतर अजित पवारांचा कोल्हेंना दम

दरम्यान,  माझ्या आडव्यात शिरू नकोस, नाहीतर बंदोबस्त लावेल, असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या भाषणात अमोल कोल्हे यांनाही दम भरला. याआधी त्यांनी निलेश लंके यांना दम दिला होता.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.