राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणारी निळू फुले यांची कन्या गार्गी आहे तरी कोण?

| Updated on: May 30, 2023 | 12:23 PM

Gargi Phule : ज्येष्ठ दिवंगत अभिनेते निळू फुले यांची कन्या गार्गी आता राजकारणात पाऊल टाकत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्या मंगळवारी प्रवेश करत आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा हा प्रवेश सोहळा होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणारी निळू फुले यांची कन्या गार्गी आहे तरी कोण?
Gargi Phule
Follow us on

पुणे : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी आपल्या अभिनयाने संपूर्ण मराठीजणांचे मनोरंजन केले. निळू फुले यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत सुमारे २५० मराठी आणि हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या. मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम कामगिरी बजावणार्‍या सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक म्हणून त्यांचा ओळख आहे. ते सामाजिक कार्यकर्तेही होते. राष्ट्र सेवा दलाचे त्यांनी काम केले होते. आता त्यांची मुलगी आणि अभिनेत्री गार्गी फुले मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

काय आहे गार्गी फुले

गार्गी फुले नाटक आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. 1998 पासून त्यांनी अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. प्रायोगिक नाट्य चळवळीत त्या चांगल्याच सक्रीय आहेत. भारतीय नाट्यक्षेत्रात मोठे नाव असलेले सत्यदेव दुबे यांच्याकडे त्यांनी काही काळ काम केले आहे. त्या सत्यदेव दुबे यांच्या विद्यार्थीनीच. त्यांनी अनेक नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी एमएची पदवी (Women Liberation) या विषयात घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

कोणत्या मालिकांमध्ये केले काम

गार्गी फुले यांनी आतापर्यंत मळभ (किरण यज्ज्ञपावीत), कोवळी उन्हे (विजय तेंडुलकर), श्रीमंत (विजय तेंडुलकर), सोनाटा (महेश एलकुंचवर), वासंसी जीर्णनी (महेश एलकुंचवर), सुदामा के चावल (वसंत देव), या नाटकात काम केले आहे. (Maharashtra Politics) तर, राजा राणी ची गं जोडी (colors मराठी), सुंदरा मनामध्ये भरली (colors मराठी), तुला पाहते रे (zee टीव्ही), कट्टी बट्टी (zee युवा), या टीव्ही मालिकांमध्ये गार्गी फुलेने काम केले आहे. भाडीपा चिकटगुंडे, राते या वेबसीरीजमध्येही त्यांनी काम केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलाकारांचा प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मराठी चित्रपटासृष्टीतील अन् मराठी कलक्षेत्रातील अनेक कलाकार प्रवेश करत आहेत. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. लोककलावंत गायक शांताबाई फेम संजय लोंढे यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार कलाकार आहे.