AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी : अजित पवार बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार नाहीत?

Ajit Pawar May be Will not contest assembly election 2024 : अजित पवार यांचं एक जुनं विधान प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे आता अजित पवार यंदाची विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा होत आहे. पण येत्या काळात अजित पवार काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे

सर्वात मोठी बातमी : अजित पवार बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार नाहीत?
अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jul 14, 2024 | 3:13 PM
Share

राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्वाची बातमी… अजित पवार यंदा बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याची चर्चा होत आहे. अजित पवार यांच्या ऐवजी आता त्यांचे पुत्र जय पवार बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची देखील चर्चा होत आहे. शरद पवार गटाकडून बारामतीतून युगेंद्र पवार यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर अजित पवार यांच्या जागेवर जय पवार यांनी विधानसभेची निवडणूक लढली तर नवी राजकीय समिकरणं समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा बारामतीत युगेंद्र पवार विरूद्ध जय पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांनी जाहीर भाषणात एक विधान केलं होतं. अजित पवार यांचं हेच भाषण सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या भाषणातील अजित पवारांचं वक्तव्य पाहता अजित पवार आता बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार नसल्याची चर्चा होत आहे. 16 फेब्रुवारीचं अजित पवार यांचं हे भाषण आहे. लोकसभेला बारामतीतून आपल्या विचारांचा खासदार निवडून दिला नाही. तर मी बारामतीतून विधानसभा निवडणुकीला उभं राहीन. नाती तर तुम्ही जर मला साथच देणार नसाल तर मला माझा संसार आहे. मी निवडणूक लढणार नाही, असं अजित पवार या सभेत म्हणाले होते. त्यांचं हे भाषण सध्या व्हायरल होत आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार कुटुंब एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभं होतं. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशा झालेल्या या लढतीत सुप्रिया सुळे जिंकल्या. मात्र त्यानंतर आता अजित पवार यांच्या जुन्या भाषणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अजित पवार यंदाची विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचं बोललं जात आहे.

समर्थकांचं म्हणणं काय?

बारामतीत राष्ट्रवादीच्या जन सम्मान रॅलीत उपस्थित असणाऱ्या लोकांच्या आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तर अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत, ही केवळ चर्चा आहे. यात कोणतंही तथ्य नाही. बारामती म्हणजे अजित पवार अशी ओळख आहे. त्यामुळे अजित दादा असा निर्णय घेणार नाहीत आणि त्यांनी तसा निर्णय घेऊही नये, असं अजित पवार यांच्या समर्थकांनी म्हटलं आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...