Pune FTI: पुण्याच्या एफटीआयच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन केली आत्महत्या; महिनाभरातील ही दुसरी घटना

पुणेः पुण्यातील भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेतमध्ये (Film Television Institute pune) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या (Girl Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेली विद्यार्थिनी एफटीआयच्या हॉस्टेलमध्ये राहत होती, ती मुळची उत्तराखंडमधील नैनीताल (Uttarakhand Nainital) येथील असून आत्महत्येचं कारण समजू शकले नाही, पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्यातील एफटीआय संस्थेत शिक्षण घेणारी […]

Pune FTI: पुण्याच्या एफटीआयच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन केली आत्महत्या; महिनाभरातील ही दुसरी घटना
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 8:23 AM

पुणेः पुण्यातील भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेतमध्ये (Film Television Institute pune) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या (Girl Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेली विद्यार्थिनी एफटीआयच्या हॉस्टेलमध्ये राहत होती, ती मुळची उत्तराखंडमधील नैनीताल (Uttarakhand Nainital) येथील असून आत्महत्येचं कारण समजू शकले नाही, पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्यातील एफटीआय संस्थेत शिक्षण घेणारी 28 वर्षाच्या विद्यार्थिनीचा एफटीआयच्या हॉस्टेलमध्ये मृतदेह मिळाला असून तिचा मृतदेह हॉस्टेलच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत मिळाला आहे. पुणे पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास चालू केला आहे. विद्यार्थिनीची माहिती घेतली जात असून या घटनेची माहिती विद्यार्थिनीच्या घरी देण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही विद्यार्थिनी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेत (एफटीआय) मध्ये शिक्षण घेत होती. ही मुळची उत्तराखंडमधील नैनीतालमधील असून संस्थेच्याच हॉस्टेलमध्येच ती राहत होती.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट

तिच्याच खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी केली असली तरी अजून पर्यंत तरी आत्महत्येचं कारण अजून समजू शकलं नाही. पुणे पोलिसांकडून पुढील तपास चालू असल्याचे सांगितले जात असून आत्महत्येबाबत काही सुसाईड नोट आहे का त्याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मित्र-मैत्रीणींची चौकशी

आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या जवळच्या मित्र मैत्रिणींकडेही चौकशी करण्यात आली असून त्यासंबंधात काही गोष्टींचा उलघडा होता का त्याचाही तपास पोलिसांकडून चालू आहे. या विद्यार्थिनीने आत्महत्या करण्यापूर्वी महिन्याभरातील ही दुसरी घटना असल्याचेही सांगण्यात येत आहे. 5 ऑगस्ट रोजीही एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती, त्यानंतर महिनाभरात ही दुसरी आत्महत्या झाली असल्याने एफटीआयमध्ये खळबळ माजली आहे.

मनोरंजन क्षेत्रावर एफटीआयचे अधिराज्य

एफटीआयमधून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी मनोरंजनाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एफटीआयसारख्या संस्थेने या देशाला अनेक मोठे कलाकार दिले आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.