AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune | हालचाली वाढल्या, चांदणी चौक परिसरात बॉम्ब शोधक पथक दाखल

पुण्यात हालचाली वाढल्या आहेत. चांदणी चौक परिसरात बॉम्ब शोधक पथक दाखल झालं आहे. पोलिसांकडून योग्य ती सर्व काळजी घेतली जात आहे. पुणेकरांसाठी उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता रात्रीपासूनच घडामोडींना वेग आला आहे.

Pune | हालचाली वाढल्या, चांदणी चौक परिसरात बॉम्ब शोधक पथक दाखल
| Edited By: | Updated on: Aug 11, 2023 | 11:23 PM
Share

पुणे | 11 ऑगस्ट 2023 : पुण्यात उद्या चांदणी चौक उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या सकाळी चांदणी चौकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे. या उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी आता पूर्ण झालीय. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरच आता पुण्यात हालचाली वाढल्या आहेत. चांदणी चौक परिसरात डॉग पथक आणि बॉम्बशोधक पथक दाखल झालंय.

पुण्यात काही दिवसांपूर्वी दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आलं होतं. या प्रकरणी दहशतवादी विरोधी पथकाकडून कसून तपास करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आला. या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आलीय. आरोपींचा पुण्यात मोठा घातपात घडवण्याचा डाव होता. याशिवाय हनीट्रॅप प्रकरणात अडकलेला प्रदीप कुरुळकर प्रकरण देखील पुण्यातूनच समोर आलं आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आता अलर्ट झाल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून काळजी घेतली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात उद्या चांदणी चौक परिसरातील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांकडून सर्व काळजी घेतली जात आहे. उद्या मोठे नेते कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॉम्बशोधक पथकाकडून संपूर्ण परिसराची चाचपणी सुरू आहे. बॉम्बशोधक पथकाकडून संपूर्ण पेंडॉलची तपासणी करण्यास सुरुवात झालीय. विशेष म्हणजे पुणे पोलिसांचे एक पथक कार्यक्रमस्थळी दाखल झालंय.

पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडणार

दरम्यान, पुण्यात उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातांबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आढावा घेणार आहेत. अपघातानंतरच्या चौकशी अहवालाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. राज्यातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या उद्याच्या बैठकीत महाराष्ट्रात अनेक नवे नियम लागण्याची शक्यता आहे.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.