AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune rain : मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई लोहमार्गावर कोसळली दरड, पुण्याहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प

अप लाइनवर ही दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद आहे. अप लाइनवरील वाहतूक मिडल लाइनकडे वळविण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र अप लाइन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे.

Pune rain : मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई लोहमार्गावर कोसळली दरड, पुण्याहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प
| Edited By: | Updated on: Aug 12, 2022 | 9:45 AM
Share

पुणे : पुणे-मुंबई लोहमार्गावर (Pune Mumbai railway line) दरड कोसळली आहे. मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान ही घटना मध्यरात्री घडलेली असून, अद्याप दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अप लाइनवर ही दरड कोसळल्याने (Boulders fall) मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद आहे. अप लाइनवरील वाहतूक मिडल लाइनकडे वळविण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र अप लाइन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. या दरड कोसळण्याच्या घटनेमुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक प्रभावित झालेली आहे. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून विषयीची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, आज 12 ऑगस्ट रोजी लोणावळ्याजवळ (Lonavala) पुणे-मुंबई लोहमार्गावर ही दरड कोसळली. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

दरड हटवण्याचे काम

घटना घडल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. बोल्डर आणि ओएचईचा खांब पडल्याने हा मार्ग ठप्प झाला आहे. दरड हटवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. विकेंड असल्याने साधारणपणे शुक्रवार ते रविवारच्या दरम्यान अनेक जण मुंबई-पुणे रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र, मध्यरात्री या घाट परिसरात दरड कोसळळ्याने रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. तर दरड बाजूला करण्याचे काम सुरू असून याला वेळ लागण्याची शक्यता रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. घटनास्थळी बंदोबस्तासाठी आरपीएफचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

दरड हटवताना कर्मचारी – व्हिडिओ

प्रभावित झालेल्या रेल्वे गाड्या

  1. 18519 उत्तर प्रदेश वेळ 02.05 तास ते 02.53 तास
  2. 12702 UP वेळ 02.35 ते 03.42 तास
  3. 11140 UP वेळ 03.04 तास ते 03.49 तास
  4. 22158 उत्तर प्रदेश वेळ 04.14 ते 04.25 तास
  5. 11006 UP वेळ 03.48 ते 04.06 तास
  6. 12116 UP वेळ 04.35 तास ते 04.44 तास
  7. 11042 UP वेळ 04.00 ते 05.24 तास.
  8. 17317 उत्तर प्रदेश वेळ 04.52 ते 49
  9. 17412 UP वेळ 05.57 ते 06.10 पर्यंत
  10. 12755 UP वेळ 06.19 ते 06.55 पर्यंत

लोणावळ्यात मुसळधार

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र मागील तीन दिवसांपासून लोणावळा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. लोणावळ्यात आत्तापर्यंत 3408 मिमीपेक्षा अधिक पाऊस बरसला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. अद्यापही पाऊस सुरू असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.