AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील पुरंदर विमानतळ होणार की नाही? नागरी उड्डाण मंत्री मोहोळ म्हणाले…

पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ शपथ घेतल्यावर पहिल्यांदा पुण्यात आले. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे नागरी उड्डाण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्यात आल्यावर त्यांनी पुरंदर विमानतळाबाबत एक वक्तव्य केलं आहे.

पुण्यातील पुरंदर विमानतळ होणार की नाही? नागरी उड्डाण मंत्री मोहोळ म्हणाले...
Pune MP Murlidhar Mohol
| Updated on: Jun 15, 2024 | 7:51 PM
Share

गेल्या अनेक वर्षांपासून पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याची घोषणा केली गेली आहे. विमानतळासाठी जागा कोणती निश्चित करावी याचीत अदलाबदली झाली. बाकी कोणतीही प्रशासकीय हालचाल पाहायला मिळाली नाही. कागदावर असलेलं विमानतळ प्रत्यक्षात कधी होणार की कामय राजकीय चर्चेचीच उड्डाण भरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यंदा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना यंदा डबल लॉटरी लागली. आधी लोकसभेचं तिकिट आणि निवडून आल्यावर केंद्रीय राज्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडली. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

पुरंदरचे विमानतळ लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे. डीजीसीएने पुरंदर विमानतळला मान्यता दिली आहे. लवकरच जागेची पाहणी होणार असल्याची माहिती राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.  शपथ घेतल्यावर पहिल्यांदा मोहोळ पुण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांसह समर्थकांनी मोहोळ यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी त्यांना काय बोलले हे त्यांनी सांगितलं.

मला सकाळी जे. पी. नड्डा यांच्या पीएचा फोन आला, सांगितल की ११ वाजता पीएम हाऊसला बोलवलं आहे. मला विश्वास बसत नव्हता की खरच आहे की काय? स्वप्नवत होत हे सगळं पीएम हाउसला गेल्यावर वेगळ वाटलं. मोदी म्हणाले की, कैसे हो पुणेकर सहकार आणि सिविल एविएशनची दोन खाती मिळाली. बिग बॉस बरोबर काम करायला मिळणार, पुण्याला एक नंबर करायच आहे . पुणेकरांसाठी खूप काम करायचं असून आता पुणेकरांच्या अपेक्षा आता वाढल्या हे स्वाभाविक असल्याचं मुरलीधर मोहोळ म्हणाले.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेचे महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ यांनी जबाबदारी पार पाडली.  पुण्यातून त्यांना तिकिट मिळाल्यावर त्यांची लढत काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्यासोबत झाली. यामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.