AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पुण्याजवळ अपघात, गंभीर जखमी झाल्याची माहिती

काँग्रसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांच्या कारला पुण्यात अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात छाजेड हे गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पुण्याजवळ अपघात, गंभीर जखमी झाल्याची माहिती
Abhay Chhajed
| Updated on: May 11, 2026 | 11:28 PM
Share

कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांच्या कारला सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास पुणे येथील पिरंगुट घाटात अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात छाजेड यांना गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात छाजेड यांचा ड्रायव्हर देखील जखमी झाला आहे. उपचारासाठी छाजेड यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार अभय छाजेड हे पिरंगुट मधील त्यांच्या आर्किटेक्चर कॉलेजमधून ते पुण्याकडे त्याच्या इलेक्ट्रिक कारने येत होते. ते चालकाच्या शेजारील आसनावर बसले होते. पिरंगुट घाटात कारचे नियंत्रण सुटले आणि ती टेकडीला आदळली. यात चालकासह ते जखमी झाले. तेथून जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना ओळखले आणि एम्ब्युलन्सने पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले आहे. त्याच्या चेहरा, मान, मणक्याला दुखापत झाली आहे.

तातडीने उपचार सुरु

अभय छाजेड यांना कंबरेच्या खाली मार लागल्याचे सूत्रांचे म्हणणे असून त्यांच्यावर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आहेत. वकील असलेले अभय छाजेड हे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ, अभ्यासू आणि पुण्याचे प्रमुख नेते आहेत. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. ते पाच वेळा पुणे महापालिकेचे नगरसेवक राहिले आहेत.

धुळे : शिरपूर- शहादा मार्गावर भीषण अपघातात एक जण ठार

भरधाव पिकअपच्या चालकाचे नियंत्रण चुकल्याने त्याने कारला जोरदार धडक दिल्याने कारमधील किशोर हिलाल मराठे (वय ४५) याचा जागीच मृत्यू तर त्यांच्या पत्नी योगिता मराठे (वय ३५ ) गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे येथील शिरपूर शहादा मार्गावर घडली आहे. शिरपूर तालुक्यातील विखरण येथून नंदुरबार येथे लग्नाच्या कार्यक्रमासाठी कारने पती- पत्नी जातांना हा अपघात घडला. वरुळ ते भामपूर रस्त्यावर भरधाव पिकअपने कारला धडक दिल्यानंतर पिकअप रस्त्यावर पलटल्याने हा अपघात घडला. किशोर मराठे हे घरातील कर्ते पुरुष होते.त्यांच्या पश्चात मुलगा ,आई,पत्नी असा परिवार आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?