AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यांच्या छातीत धडकी भरलीय, निवडणुका घ्यायचं धाडस नाही’, पृथ्वीराज चव्हाण यांनी भूकंपाच्या भाकीतची हवाच काढली

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज भाजप नेते गिरीश महाजन यांच्या भाकीताची हवाच काढली आहे. गिरीश महाजन यांनी आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप घडतील, असा दावा केलाय. त्यांच्या या दाव्यावरुन पृथ्वीराज चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या सभेत भाजपवर सडकून टीका केली.

'त्यांच्या छातीत धडकी भरलीय, निवडणुका घ्यायचं धाडस नाही', पृथ्वीराज चव्हाण यांनी भूकंपाच्या भाकीतची हवाच काढली
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 23, 2024 | 5:36 PM
Share

विनय जगताप, Tv9 मराठी, पुणे | 23 जानेवारी 2024 : भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज्यात आगामी काळात मोठे राजकीय भूकंप घडतील, असं भाकीत वर्तवलं आहे. काँग्रेसचे जळगावचे बडे नेते डॉ. उल्हास पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उल्हास पाटील यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर बोलताना गिरीश महाजन यांनी तुम्हाला अपेक्षितही नसतील असे मोठे राजकीय भूकंप महाराष्ट्रभर होतील, असं मोठं वक्तव्य केलं. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याची हवा काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी यावेळी भाजपवर सडकून टीका केली.

काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज पुण्यात अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी संबोधित केलं. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. “अतिशय चांगली आढावा बैठक आज झाली. यानंतर 6 विभागीय बैठका होणार आहेत आणि नंतर लोणावळा येथे शिबिर होईल. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष निवडणूक लढणार की संघटनात्मक निवडणुका लढायच्या हे ठरवणं महत्वाचं आहे. बुथ कमिट्या निर्माण करणं गांभीर्याने घ्या”, असे आदेश पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले.

‘उगाच अशा बातम्या पेरायचं काम सुरू’

“पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुका व्यक्तीकेंद्रित करू पहात आहेत, आणि त्याला काही प्रमाणात यशही येतंय. लोकसभा मतदारसंघ पाहिले तर निवडणुकीत भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता नाही. उगाच हा इकडे जाणार, तो तिकडे जाणार अशा बातम्या पेरायचं काम सुरू आहे. त्यांच्यात निवडणुका घ्यायचं धाडस नाही, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यांच्या छातीत धडकी भरली आहे”, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला.

‘पण चुकीचं होणारच’

“नरेंद्र मोदी यांनी 2014ला निवडणूक आर्थिक विषयावर लढवली, अच्छे दिन आएंगे. 2019 ची निवडणूक राष्ट्रीय सुरक्षितेवरून लढवली. बालाकोट घटना. आता नवीन मुद्दा पाहिजे होता म्हणून कालचा राम मंदिरचा इव्हेंट. राम मंदिर हे मुळ जागेपासून 4 किमी लांब आहे. जुन्या मूर्ती कुठं आहेत? नवीन मुर्त्या कशा आल्या? मंदिर अर्धवट होतं म्हणून शंकराचार्य यांनी विरोध केला. मग ज्योतिषाला विचारून उपवास केला, आज बहुतेक जेवले असतील, जमिनीवर झोपले, काही चुकीचं होऊ नये म्हणून. पण चुकीचं होणारच आहे”, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?