AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात चंद्रकांत पाटील यांची विद्यार्थ्यांनी गाडी अडवली, चारही बाजूने घेराव, नेमकं काय घडलं?

पुण्यात शिक्षण आुक्तांच्या कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवली. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा देखील प्रयत्न केला. पण आंदोलक विद्यार्थी इतके आक्रमक झाले होते की चंद्रकांत पाटील त्यांच्याशी संवाद साधू शकले नाहीत.

पुण्यात चंद्रकांत पाटील यांची विद्यार्थ्यांनी गाडी अडवली, चारही बाजूने घेराव,  नेमकं काय घडलं?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 11, 2024 | 5:19 PM
Share

पुणे | 11 जानेवारी 2024 : डीएड बीएडच्या विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या परिसरात मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी विद्यार्थ्यांनी अडवली. शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी देखील या परिक्षार्थी आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. यावेळी विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. विद्यार्थ्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनामुळे परिसरात काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं.

पुण्यातील शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर गेल्या काही दिवसांपासून डीएड आणि बीएडचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. शिक्षण भरतीमध्ये इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांचं जे स्वतंत्र आरक्षण आहे ते रद्द करण्यात यावं आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा, अशी या आंदोलक विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. हीच मागणी घेऊन आंदोलक विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटील त्या परिसरात आले असता त्यांची गाडी अडवली. आंदोलक कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला घेराव घातला. विद्यार्थ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

अखेर पोलिसांनी केली मध्यस्थी

इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करावं कारण त्यामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय, अशी भूमिका या विद्यार्थ्यांची आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी हा अन्याय आहे, असंदेखील या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी गाडीला घेराव घातला तेव्हा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साध्यण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण बघायला मिळालं होतं. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी पुढे सोडण्यात आली.

डीएड आणि बीएडचं शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना आज नोकरी मिळणं खरंच खूप अवघड आहे. अनेक विद्यार्थी नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. काही विद्यार्थी खूप तुटपुंज्या पगारात काम करत असतात. तर काही विद्यार्थी आपण पर्मनंट होऊ या आशेने वर्षोनुवर्षे एखाद्या शिक्षण संस्थेत कार्यरत असतात. अशा तरुणांचा नोकरीचा प्रश्न सोडवणं हे फार गरजेचं आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!