यांच्या भाषणामुळं मी अस्वस्थ, रात्री झोप लागत नसल्याचं दीपक केसरकरांचं वक्तव्य

| Updated on: Oct 07, 2022 | 5:05 PM

त्यासाठी मी शिर्डीला जाऊन दर्शन घेऊन मन शांत करुन आलो, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं.

यांच्या भाषणामुळं मी अस्वस्थ, रात्री झोप लागत नसल्याचं दीपक केसरकरांचं वक्तव्य
दीपक केसरकरांनी सांगितलं कारण...
Image Credit source: social media
Follow us on

रणजित जाधव, Tv9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आज पुण्यात होते. यावेळी बोलताना दीपक केसरकर म्हणाले, उद्वव ठाकरेंच्या भाषणातील वक्तव्यांमुळे मी अस्वस्थ झालो. डुक्कर ही भाषा संजय राऊतांच्या तोंडी शोभते. उद्वव साहेबांच्या तोंडी शोभत नाही. एकनाथ शिंदेंचा मला अभिमान आहे. त्यांच्याबद्दल उद्वव ठाकरे जे बोलले, त्यामुळे मी अस्वस्थ आहे. मला रात्री झोप लागत नाही. त्यासाठी मी शिर्डीला जाऊन दर्शन घेऊन मन शांत करुन आलो, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं.

मी उद्धव ठाकरेंबाबत काहीही बोलणार नाही. त्यांनी आमच्या आमदारांबाबत आणि सरकारबाबत काहीही बोलले तरी मी उत्तर देणार नाही, असंही ते म्हणाले.

दसरा मेळाव्यात मी झोपलो असा आरोप केला जातो. मी तर विचार करत होतो. मी झोपलो असतो तर माझे हात कसे हलले असते, असा सवाल केसरकर यांनी केला.

दीपक केसरकर म्हणाले, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मिटिंगसाठी आलोय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत पुस्तकाबरोबर वह्या देण्याचा निर्णय घेणार आहे. नोट्स पुस्तकांना बाईंडिंग करून जोडणार आहोत. याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला का नाही ते कमिटीमार्फत तपासलं जाणार आहे.

कमिटीचं मार्गदर्शन घेऊन तिसरीपर्यंत परीक्षेबाबतचा निर्णय घेऊ. आठवीपर्यंत कुठलाही मुलगा नापास होणार नाही. या कमिटीमध्ये मानसोपचार तज्ज्ञ असणार आहे. या कमिटीचा जीआर आठवड्यात निघेल.

श्रीमंत लोकांच्या मुलांना पुस्तक देत नाही, ही संख्या 10 टक्के आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शासनाकडून मुलांना गिफ्ट देत आहेत. तिसरीपासून परीक्षा घेतली गेली पाहिजे की नाही याबाबत शिक्षकांशी चर्चा केली जाईल.मानसोपचार तज्ज्ञांकडून विचार घेणार मग निर्णय घेणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं.

प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचले पाहिजे. TET मध्ये ज्या लोकांनी पैसे देऊन पास झाले असतील त्यांना माफी नाही. पोलिसांच्या तपासात दोषी आढळून आले असतील त्यांना वगळून निकाल जाहीर केला जाईल. मुख्य प्रवक्ता म्हणून माझी प्रेस कॉन्फरन्स होईल सर्व उत्तर देईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिक्षक संघटना पगारासाठी 12 ते 15 वर्षे थांबल्या. आता लगेच का आंदोलन करता, मला थोडा वेळ द्या, मला महिनाभर द्या. अभ्यास करायला वेळ दिला पाहिजे. माझी न्याय देण्याची तळमळ आहे, असंही ते म्हणाले.