AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : अमित शाहंसमोर एकनाथ शिंदेंचा ‘जय गुजरात’चा नारा VIDEO

Eknath Shinde : "अमित भाई देशाचे गृहमंत्री आहेतच. पण महाराष्ट्राचे जावई आहेत. त्यांच्या होममिनिस्टर महाराष्ट्र कोल्हापुरच्या आहेत. त्यांच्या घरात मराठी आणि गुजराती दोन्ही भाषा आनंदाने नांदतात. महाराष्ट्र, गुजरात दोन्ही राज्यांनी विकास, उद्योग, संस्कृतीच्या क्षेत्रात नेहमीच देशाला दिशा दाखवली" असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde : अमित शाहंसमोर एकनाथ शिंदेंचा 'जय गुजरात'चा नारा VIDEO
Eknath Shinde
| Updated on: Jul 04, 2025 | 4:02 PM
Share

“आजचादिवस पुना गुजराती समाजासाठी ऐतिहासिक दिवस आहे. इथे कुठस्या गोष्टीची कमतरता नाहीय. कारण तुम्ही सर्व लक्ष्मीपुत्र आहात. त्यामुळे काही कमी पडण्याचा प्रश्नच येत नाही. मोदीजी ज्या कार्याचं भूमिपूजन करतात ती काम वेगवान गतीने पूर्ण होतात. मी आपला अनुभव सांगतोय, समृद्धी हायवे असो, कोस्टल रोड असो अशी अनेक उदाहरण आहेत. त्यांचं भूमिपूजन आणि उद्घाटन दोन्ही मोदीजींनी केलं. या वास्तूच भूमिपूजन मोदीजींनी केलं. पण लोकार्पण अमित भाईंच्या हस्ते होतय” असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते कोंढवा बुद्रुक येथे जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात अमित शाह यांचं भरभरुन कौतुक केलं.

“नरेंद्र मोदी आणि अमित शाह आमच्यासाठी वेगळे नाहीत. मोदीजींची सावली म्हणजे अमितभाई आहेत. अमित शाहांचा स्पर्श झाल्यानंतर त्या कार्याचं सोनं होतं. तुम्ही सर्व लक्ष्मीपुत्र आहात. आंनंद दिघे साहेबांचे शब्द मला आठवतात. कुठलही शहर असो, गहसंकृल असो, त्या शहराला बाजारपेठ नसेल तर शोभा वाढत नाही. व्यवसाय, बाजारपेठ बनवणारे तुम्ही लोक आहात. तुम्ही व्यपारी आहात. तुमच्याशिवाय कुठल्या शहराची शोभा वाढत नाही” अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं.

‘अमित भाई आव्हानाला ते संधी समजतात’

“या सेंटरचा भविष्यात अजून विस्तार होईल. अमित भाई राष्ट्रहिताल पहिलं प्राधान्य देतात. आव्हानाला ते संधी समजतात. त्यांच्या कार्यशैलीत दृढता, संकल्प आहे. नव्या भारताच्या निर्माणात मोदींसोबत त्याचं योगदान महत्त्वाचं आहे. अमित भाई कुशल रणनितीकार आहेत. त्यांच्या रणनितीने नेतृत्वाने अशक्य ते शक्य करुन दाखवलं. काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय असो. अमित शाहंनी राष्ट्रहिताला नेहमी वरती ठेवलं” असं कौतुक करताना एकनाथ शिंदे म्हणाले. ‘अमित शाह चट्टानासारखे माझ्यामागे उभे होते’

“भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी त्यांचं उज्वल भविष्याच स्वप्न आहे. मला स्वत:ला अनुभव आहे. 2022 साली तुम्हाला माहित असेल, या राज्यात मंदिरं, बाजारपेठा सगळं बंद होतं. सगळे स्पीड ब्रेकर होते. त्यावेळी सर्वसामान्यांच सरकार आणण्याची गरज होती. मोदीजींच मार्गदर्शन होतच. पण अमित शाह चट्टानासारखे माझ्यामागे उभे होते. काम सोपं नव्हतं. राज्याच्या विकासाची विषय येतो, तेव्हा अशी पावल उचलावी लागतात” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘त्यांच्या घरात मराठी आणि गुजराती दोन्ही भाषा आनंदाने नांदतात’

“आज मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एक टीम बनून काम करत आहोत. या राज्याला पुढे घेऊन जात आहोत. मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. अशीच एकजूट मजबूत ठेवा. या राज्याच्या विकासात आपलही योगदान आहे. आपल्याला उद्योग, व्यवसायात कुठली अडचण येणार नाही असा विश्वास व्यक्त करतो” असं एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी अमित शाहंसाठी त्यांनी एक खास शेर म्हटला. भाषण संपवताना एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात म्हटलं.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.