
प्रशिक्षण घेत असताना सरकारी सुविधांची मागणी करणं, ओबीसीतून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणं अन् दिव्यांग प्रमाणपत्र सादर करत आयएएसपदी नियुक्ती होणं… हे सगळे गंभीर आरोप प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आले आहेत. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. त्यामुळे यावर बोलणं योग्य नाही, असं म्हणत खेडकर कुटुंबाने या सगळ्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. मात्र आता पूजा यांच्या वडिलांनी या प्रकरणावर भाष्य केलं होतं. पूजा खेडकर यांनी या सुविधांची मागणी केली होती का? यावर पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
एका प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला स्वतंत्र केबीन, अंबर दिवा, सरकारी वाहन या सुविधांची गरज का पडली? यावर दिलीप खेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयीन वापरासाठी सरकारी गाड्या दिलेल्या असतात. जिल्हाधिकारी कार्यालय हे मुख्यालय असलं तरी आजूबाजूच्या शासकीय कार्यालयात त्यांना जावं लागतं. प्रशिक्षणासाठी पूजा पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्यानंतर पहिल्या दिवशी मी जॉईन झाले आहे मी कुठे बसू असं विचारलं. तर तिचे वरिष्ठ म्हणाले की, तुम्हाला या सुविधा मिळू शकत नाहीत. तर पूजाने म्हटलं की ठीक आहे. पण किमान मला वॉशरूम तरी वेगळं हवं आहे, असं पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी सांगितलं.
पूजाने स्वतंत्र वॉशरूमची मागणी केल्यानंतर तिचे वरिष्ठ म्हणाले की तू माझ्या केबीनमधील वॉशरूम वापरू शकतेस. तेव्हा पूजा शांत बसली. पूजा तीन जूनला जॉईल झाली. चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल होता. तेव्हा मतमोजणी केंद्रावर सकाळी सहा वाजता बोलावण्याच आलं. तेव्हा सहाय्यक मतदान अधिकाऱ्यांना तिने सांगितलं की, मला तुमच्यासोबत घेऊन जा. तेव्हा त्यांनी सांगितलं की आपआपल्या पद्धतीने जायचं आहे. ती नातेवाईकांच्या गाडीने मतदान केंद्रावर पोहोचली, असं दिलीप खेडकर यांनी सांगितलं.
मतदान केंद्राच्या बाहेर तिला अडवण्यात आलं. गाडी घेऊन जाता येणार नाही, असं तिथं असणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांनी पूजाला सांगितलं. त्यादिवशी पूजा दोन किलोमीटर चालत गेली. ही गोष्ट तिने ही सगळी गोष्ट जिल्हाधिकाऱ्यांनी ही सगळी गोष्ट सांगितली. तेव्हा तुला देण्यासाठी आपल्याकडे गाडी नाहीये. पण तुला मिळणाऱ्या प्रवास भत्त्यातून भाड्याची गाडी किंवा तुझी गाडी वापर आणि त्यावर ‘महाराष्ट्र सरकार’ असा बोर्ड लिही. त्यावर अंबर दिवा लावला तर तुला अशी अडचण येणार नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे पूजाने गाडीवर दिवा लावला, असं खेडकरांनी सांगितलं.
अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की स्टोअर रूममध्ये बसण्यापेक्षा तू माझ्या केबीनमधील काही भाग वापरू शकते. हे सगळं माझ्या डोळ्यासमोर झालं.या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीच तो टेबल आणि इतर साहित्य लावलं. , असं दिलीप खेडकरांनी म्हटलं.