पुणे विमानतळावरुन आणखी तीन शहरांसाठी सेवा, आता कमी वेळेत गाठा ही शहरे

Pune News : पुणे विमानतळावरुन अनेक प्रकारच्या सुविधा सुरु केल्या गेल्या आहेत. या विमानतळावरुन विमानांच्या फेऱ्या वाढवल्या जात आहेत. आता अजून तीन नवीन शहरांना शुक्रवारपासून विमान सुरु झाले आहेत.

पुणे विमानतळावरुन आणखी तीन शहरांसाठी सेवा, आता कमी वेळेत गाठा ही शहरे
| Updated on: Jul 08, 2023 | 9:51 AM

पुणे : पुणे शहर औद्योगिक अन् शैक्षणिकदृष्या महत्वाचे केंद्र झाले आहे. त्यामुळे पुणे शहरात येणाऱ्या लोकांची संख्याही मोठी असते. यामुळे पुणे विमानतळाचा विकास केला जात आहे. या विमानतळावर अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पुण्यातील लोहगाव विमानतळावरील रन वे लायटिंगचे काम झाल्यामुळे २४ तास विमान वाहतूक शक्य झाली आहे. यामुळे पुणे शहरातून विविध शहरांना जोडण्याचे काम सुरु झाले आहे. पुणे शहरातून मागील महिन्यात विमानांच्या फेऱ्या वाढवल्या गेल्या होत्या. आता पुणे शहरातून ७ जुलैपासून तीन नवीन शहरांसाठी विमानसेवा सुरु झाल्या आहेत.

कुठे सुरु झाले विमाने

पुणे विमानतळावरुन राजकोट, वडोदरा आणि जोधपूर या शहरांसाठी शुक्रवारपासून विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता जोधपूरसह राजकोट अन् वडोदार येथे कमी वेळेत पुण्यावरुन जाता येणार आहे. जून महिन्यात गो फस्टकडून नवी दिल्ली, बेंगळूर, नागपूरसाठी सात विमानफेऱ्या सुरु झाल्या होत्या. त्यानंतर आता इंडिगो कंपनीने सेवा सुरु केली आहे.

या कंपनीकडून राजकोट, वडोदरा आणि जोधपूर ही शहरे जोडली गेली आहे. यामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान हा त्रिकोण कंपनीने पूर्ण केला आहे. पुणे राजकोट विमानसेवा आठवड्यातून एक दिवस तर पुणे वडोदरा आणि जोधपूर शहरासाठी आठवड्यातून पाच दिवस सेवा असणार आहे, अशी माहिती कंपनीचे पदाधिकारी विनय मल्होत्रा यांनी सांगितले.

सध्या किती शहरांमध्ये सेवा

पुणे शहरातून सुमारे 89 ते 92 ठिकाणी विमानसेवा सुरु आहे. पुणे शहरात येणारे  विमान आणि पुणे शहरातून जाणारे विमाने असे मिळून ही संख्या 178 ते 184 आहे. सणांच्या कालवधीत ही संख्या दोनशेपेक्षा जास्त जाते. त्यामुळे पुणे शहरातून हवाईमार्गे देशभरात जाण्याची सुविधा निर्माण झाली आहे. पुणे शहरातून रेल्वेनंतर हवाई मार्गाने देशभरातील अनेक शहरांमध्ये आता पोहचता येणार आहे. त्याचा फायदा पुणे शहरात शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी येणाऱ्या अनेकांना होणार आहे.