corona alert| जिल्हा प्रशासन सर्तक ; भोरमध्ये लहान मुलांसाठी कोरोनाच्या सुसज्ज वार्डची निर्मिती

भोर उपजिल्हा रुग्णालयातं लहान मुलांसाठी सर्व सुविधा असलेला सुसज्ज कोरोना वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या वार्डमध्ये 1 ते 10 वयोगटातील मुलांवर उपचार करण्यात येणार आहेत.

corona alert|  जिल्हा प्रशासन सर्तक ; भोरमध्ये लहान मुलांसाठी कोरोनाच्या सुसज्ज वार्डची निर्मिती
कोरोना
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 7:24 PM

पुणे – कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वाढत धोका लक्षात घेऊन, भोर उपजिल्हा रुग्णालयातं लहान मुलांसाठी सर्व सुविधा असलेला सुसज्ज कोरोना वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या वार्डमध्ये 1 ते 10 वयोगटातील मुलांवर उपचार करण्यात येणार आहेत.

असा होईल उपचार

मुलांची आवड लक्षात घेऊन,मुलांमधली हॉस्पिटलची भीती घालविण्यासाठी विशिष्ट पद्धतीने बाल कोविड वार्डची रचना करण्यात आली आहे. भिंतीची रंगरंगोटी आणि मुलांसाठी खेळांच्या साहित्याबरोबरच टेडीबियर, छोटया भीम सारख्या बाहुल्या या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. ध्रुव प्रतिष्ठानच्या सहकार्याने भोर उपाजिल्हा रुग्णलयात हे कोविड सेंटर तयार करण्यात आलय.लहान मुलांच्या कोविड वार्ड बरोबरच अत्याधुनिक मोड्युलर ऑपरेशन थेटरही सुरू करण्यात आले आहे

पुण्यातील आजची कोरोनाची स्थिती
आज पुण्यात दिवसभरात120  पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसभरात72  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01  एकूण 02 रुग्णांचे मृत्यू झाले आहे. तर शहरात 77 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या पाच लाख आठ हजार 744 इतके झाली आहे. सद्यस्थितीला ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 942  आतापर्यंत एकूणनऊ हजार112 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंतचे चार लाख 98 हजार 690नागरिकांना डिस्चार्ज दिला आहे. आज एकूण सात हजार429  नमुन्यांची (स्वॅब) तपासणी केली आहे.

कोंबड्या फक्त भाईच्याच दुकानात घ्यायच्या… दुकानदाराला टोळक्याची मारहाण; कल्याणमध्ये चाललंय काय?

MPSC | MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, दीड वर्षांनी नियुक्तीचा आदेश काढला – Tv9

Pravin Darekar | एसटीच्या विलिनीकरणावर बोलण्याऐवजी दडपशाही सुरु आहे – प्रवीण दरेकर