शिक्षण विभागाचा आदेश पुण्यातल्या शाळेकडून पायदळी, फी साठी विद्यार्थ्यांना बाहेर बसवलं, पालकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर माघार

| Updated on: Oct 04, 2021 | 1:44 PM

राज्यात शाळा सुरु होत असताना पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या ज्ञानगंगा शाळेत मागच्या वर्षीची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शाळेच्या पहिल्याच दिवशी अपमानकारक वागणूक मिळाल्याने पालक आणि विद्यार्थी आक्रमक झाले.

शिक्षण विभागाचा आदेश पुण्यातल्या शाळेकडून पायदळी, फी साठी विद्यार्थ्यांना बाहेर बसवलं, पालकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर माघार
ज्ञानगंगा शाळा, पुणे
Follow us on

पुणे : राज्यात शाळा सुरु होत असताना पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या ज्ञानगंगा शाळेत मागच्या वर्षीची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शाळेच्या पहिल्याच दिवशी अपमानकारक वागणूक मिळाल्याने पालक आणि विद्यार्थी आक्रमक झाले. यानंतर शाळेने आता नमती भूमिका घेतलीय. पालकांना फी भरण्यासाठी मुदत वाढवून देणार असल्याचं प्राचार्या रेणुका दत्ता यांनी आश्वासन दिलं आहे.

मुंबईसह राज्यभरात आज तब्बल दीड वर्षांनी पुन्हा शाळा सुरु होत आहेत. मोबाईलऐवजी आजपासून पुन्हा शिक्षक प्रत्यक्ष वर्गात विदयार्थ्यांना धडे देणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु असताना पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करावा, जेणेकरुन मनावरील ताण, भीती कमी होईल, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मात्र पुण्यात ज्ञानगंगा शाळेने पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा आदेश पायदळी तुडविला.

शाळेची माघार!

फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना बाहेर काढल्यानंतर आक्रमक झालेल्या पालकांसमोर शाळा प्रशासनाने नमती भूमिका घेतली. पालकांना फी भरण्यासाठी मुदत वाढवून देणार असल्याचं प्राचार्या रेणुका दत्ता यांनी आश्वासन दिल आहे.

आम्ही पालकांना यापूर्वी वेळोवेळी की साठी मागणी केली होती आणि याची पूर्वकल्पना दिली असल्याची माहिती प्राचार्य दत्ता यांनी दिली. पुढील काळामध्ये पालकांना मुदतवाढ दिली जाईल. मात्र फी भरावी लागणारच आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळत असला तरीही फी चा भार पालकांच्या डोक्यावर असणार आहे.

फीसाठी शाळेने विद्यार्थ्यांना बाहेर बसविल्यानंतर विद्यार्थी पालक आक्रमक झाले होते. पालकांच्या आक्रमक भूमिकेनंतर शिक्षण अधिकारी सचिन काळे यांनी शाळेला भेट दिली. शाळेत गेल्यानंतर विरोधाभास पाहायला मिळाला असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. शाळेची चुकी असेल तर शाळेवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी सचिन काळे यांनी दिलाय.

राज्यभरातील शाळा सुरु, नियम काय?

ग्रामीण भागातील पहिली ते चौथी व शहरातील पहिली चे सातवीच्या शाळा सुरु होईपर्यंत या वर्गातील ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवावे. आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षकांनी भेट देऊन त्यांना मार्गदर्शन करावं. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि शालेय गणवेशाचे वाटप लवकरात वकर करावे. शालेय कामकाजाचे तास वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा. शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात यावा, निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

शाळेसाठी नियमावली काय?

-एका बेंचवर एक विद्यार्थी
-शाळा प्रवेशासाठी पालकांची मंजुरी आवश्यक
-सर्व विद्यार्थी शाळेत येणार असतील तर एक दिवस आड शाळा
-एका दिवशी १५ ते २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश
-सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक
-मास्क परिधान करणे आवश्यक
-सॅनिटायजर वापरणं गरजेचं

(Dnyanganga School in Pune did not give entry to students Due to fees)

हे ही वाचा :

Mumbai School Reopen : मुंबईत शाळा सुरु, एका बेंचवर एक विद्यार्थी, पालकांची संमती आवश्यक, वाचा काय काय नियम