Mumbai School Reopen : मुंबईत शाळा सुरु, एका बेंचवर एक विद्यार्थी, पालकांची संमती आवश्यक, वाचा काय काय नियम

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह मुंबईतल्या शाळा आजपासून म्हणजेच 4 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु होतील. राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन मुंबईतल्या शाळा सुरु होणार आहेत.

Mumbai School Reopen : मुंबईत शाळा सुरु, एका बेंचवर एक विद्यार्थी, पालकांची संमती आवश्यक, वाचा काय काय नियम
शाळा सुरु
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 7:17 AM

मुंबई : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह मुंबईतल्या शाळा (Mumbai School Reopen) आजपासून म्हणजेच 4 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु होतील. राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन मुंबईतल्या शाळा सुरु होणार आहेत. राज्य सरकारनं याअगोदर ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. आता मुंबईतल्या शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. एका बाकावर एक विद्यार्थी, एक दिवसाआड उपस्थिती यासह इतर नियमांचं पालन करुन मुंबईतल्या शाळा आजपासून सुरु होणार आहेत.

शाळेसाठी नियमावली काय?

-एका बेंचवर एक विद्यार्थी -शाळा प्रवेशासाठी पालकांची मंजुरी आवश्यक -सर्व विद्यार्थी शाळेत येणार असतील तर एक दिवस आड शाळा -एका दिवशी १५ ते २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश -सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक -मास्क परिधान करणे आवश्यक -सॅनिटायजर वापरणं गरजेचं

कोरोना संपलेला नाही, विद्यार्थ्यांनो काळजी घ्या, महापौरांचं आवाहन

कोरोना अजूनही संपला नाही. सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. आता आपणही काळजी घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील शाळा आजपासून म्हणजेच 4 ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. विद्यार्थ्यांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलंय.

70 टक्के शिक्षकांचं लसीकरण पूर्ण

मुंबईत शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. शिक्षकांचं 70 टक्के लसीकरणही झालं आहे. पालिकेच्या 10 हजार शिक्षकांपैकी 7 हजार शिक्षकांचं लसीकरण झालं आहे. या सर्वांचा आढावा घेण्यात येणार आहे, असंही महापौर पेडणेकर यांनी सांगितलं.

कोरोना नियम पाळून राज्यातील शाळाही सुरु होणार

मुंबईबरोबरच राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील 5 ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करुन शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सकडून सूचना मिळाल्या आहेत.

पालकांची संमती महत्त्वाची

राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत आहेत पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. ज्या विद्यार्थ्यांचे पालक मंजुरी देणार नाहीत त्यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती करु नये, अशा सूचनाही वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.

(Mumbai school and jr collages reopen Today 4th October std 8th to 12th class restart new guidelines)

हे ही वाचा :

Mumbai School Reopen : मुंबईतल्या शाळा सुरु होणार, ‘या’ तारखेपासून 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु, BMC चा मोठा निर्णय

Varsha Gaikwad : ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी, शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार : वर्षा गायकवाड

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.