Dr. Prakash Amte: डॉ. प्रकाश आमटे यांची प्रकृती पुन्हा बिघडली, रुग्णालयात केलं दाखल

| Updated on: Jun 28, 2022 | 4:31 PM

बाबांना काल परत रुग्णालयात केले आहे. आता सर्व व्हिसिटर्सना पूर्ण प्रवेश बंद केलाय डॉक्टरांनी. बाबांच्या फोन वर कॉल करू नये. ताप अजून आहे. गेली 5 दिवस झाले पुन्हा इन्फेक्शन झाले आहे आणिताप अधिक आहे.

Dr. Prakash Amte:  डॉ. प्रकाश आमटे यांची प्रकृती पुन्हा बिघडली, रुग्णालयात केलं दाखल
Follow us on

पुणे- जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे (Dr. Prakash Amte)यांची प्रकृती पुन्हा बिघडली कोथरुडमधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात करण्यात आलं दाखल आहे. प्रकाश आमटे यांना अजूनही ताप असून गेली 5 दिवसापासून इन्फेक्शन झालं असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच आमटे यांना यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरचेही (Hair cell leukemia blood cancer) निदान झाले होते. त्यावरील उपचारासाठी त्यांना १७ जूनला रुग्णालयात दाखल करण्यातआले होते.  त्यांच्यावर उपचारही सुरु होते. काही दिवस उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातवून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र पुन्हा न्यूमोनियाची लागण झाल्याने पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकाश आमटे यांच्या मुलगा अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्टच्या (Facebook  Post) माधमातूनही माहिती दिली आहे.

डॉक्टरांनी दिल्या या सूचना

दीनानाथ रुग्णालयात डॉ. आमटे यांना दाखल केल्यानंतर आता डॉक्टरांनी सर्व व्हिसिटर्सला पूर्ण प्रवेश बंद केला आहे. तसेच त्यांच्या फोन वर कॉल न करण्याचे आवाहन अनिकेत आमटे यांनी केलं आहे.

अनिकेत आमटे काय म्हणाले

बाबांना काल परत रुग्णालयात केले आहे. आता सर्व व्हिसिटर्सना पूर्ण प्रवेश बंद केलाय डॉक्टरांनी. बाबांच्या फोन वर कॉल करू नये. ताप अजून आहे. गेली 5 दिवस झाले पुन्हा इन्फेक्शन झाले आहे आणिताप अधिक आहे. आज काही टेस्ट होतील. त्याचे रिपोर्ट २-३ दिवसांनी येतील. जे काही असेल अपडेट ते सोशल मीडिया वर टाकत जाईन. कृपया फोन करून तब्येत विचारू नका. कृपया त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पण कॉल करून त्रास देऊ नये. योग्य उपचार सुरू आहेत. माझ्या व्हॉट्सअप मेसेज वर कधीतरी चौकशी करू शकता. मोबाईलवर पर्सनल मेसेज करून विचारपूस करावी ही विनंती. लगेच उत्तराची अपेक्षा करू नये. आपले प्रेम आणि काळजी आम्ही समजू शकतो पण या टेन्शन मध्ये आणि बिझी असल्याने उत्तर लगेच मिळेल ही अपेक्षा करू नये. समजून घ्याल ही अपेक्षा. Dinanath Mangeshkar Hospital Pune येथे येऊन गेले असल्यास खाली रजिस्टर ठेवले आहे त्यावर आपण शुभेच्छा संदेश, नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहावा. भेटीची अपेक्षा आणि आग्रह मुळीच करू नये. बरे झाल्यावर नक्की भेटायला यावे हेमलकसाला. ?? अनिकेत आमटे.