AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri-Chinchwad crime| पिंपरीत वल्लभनगर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

मृत संजय सरवदे वय 43 पिंपरीतील वल्लभनगर आगारात कार्यरत होते. घटनेच्या वेळी रात्री जेवण करून बाथरूममध्ये गेले. बराचवेळ बाहेर आले नाहीत म्हणून कुटुंबियांनी बाथरूमचा दरवाजा वाजवला मात्र बराचवेळ दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडून बघितले असता ते गळफास घेतलेल्या स्थितीत ते  आढळून आले.

Pimpri-Chinchwad crime| पिंपरीत वल्लभनगर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांने उचलले 'हे' टोकाचे पाऊल
crimeImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Feb 27, 2022 | 3:24 PM
Share

पिंपरी – शहरातील वल्लभनगर एसटी आगारातील (ST Depo) बसवाहक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांने (Employee)  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संजय सरवदे वय 43 असं कर्मचाऱ्यांच नाव असून ते सांगवी भागात वास्तव्यास होते. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनात ते सहभागी होते त्यामुळे कामावर रुजू नव्हते. काल रात्रीच्या सुमारास जेवण करून संजय सरवदे हे बाथरूम मध्ये गेले बराच वेळ ते बाहेर न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी आत तपासणी केली असता त्यांनी गळफास घेतला असल्याचे आढळून आले. एसटी कर्मचारी संजय सरवदे (Sanjay Sarvade) यांनी आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नेमक काय झालं

मृत संजय सरवदे वय 43 पिंपरीतील वल्लभनगर आगारात कार्यरत होते. घटनेच्या वेळी रात्री जेवण करून बाथरूममध्ये गेले. बराचवेळ बाहेर आले नाहीत म्हणून कुटुंबियांनी बाथरूमचा दरवाजा वाजवला मात्र बराचवेळ दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडून बघितले असता ते गळफास घेतलेल्या स्थितीत ते  आढळून आले. नेमकं कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळं कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. परिसरातही या घटनेमुळं खळबळ निर्माण झाली आहे.

भीक मांगो आंदोलन

एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी राज्याच्या विविध भागात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले होते.त्यानंतर अनेक दिवस हे आंदोलन सुरु होते. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या विचारात घेत कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करत आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही करण्यात आले होते.मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले होते. त्यानंतर प्रजासत्ताक दिनीही भीक मागो आंदोलन करण्याच आले आहे. राज्य सरकारकडून अद्याप कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्यामुळे कर्मचा-यांनी आज रस्त्यावर उतरून भीक मागो आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. त्यामध्ये कर्मचारी प्रत्यक्षात भीक मागत असल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी चिंचवड आणि जळगावमध्ये हे आंदोलन केले आहे.

Russia Ukraine War : चाळीसगावचा प्रसन्न निकम युक्रेनमध्ये अडकला, कुटुंबीयांची दुतावासाकडे मदतीची मागणी

VIDEO : नाही तर म्हणाल Ajit Pawar नव्या पिढीवर घसरले, अजितदादांची तुफान फटकेबाजी | Raigad |

Video: जीव वाचवण्यासाठी गाडीतून निघाले, पण रस्त्यावर येताच बॉम्बच्या तावडीत सापडले? युक्रेनमधील थरारक घटना

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.