Power outage| अखेर 8-9 तासाच्या अथक प्रयत्नानंतर पुणे व पिंपरी चिंचवडमधील वीज पुरवठा पूर्ववत ; टप्पाटप्प्याने वीज पुरवठा केला सुरळीत

र्वप्रथम रुग्णालये, पाणीपुरवठा योजना, घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. तसेच महापारेषणच्या युद्धपातळीवरील दुरूस्ती कामामुळे टॉवर लाईनच्या पाच पैकी दोन सर्कीटच्या दुरूस्तीचे काम दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण झाले. त्यामुळे या दोन्ही सर्कीटवरून महावितरणच्या काही उपकेंद्रांना वीजपुरवठा सुरू झाला व उर्वरित भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यास आणखी वेग देण्यात आला.

Power outage| अखेर 8-9 तासाच्या अथक प्रयत्नानंतर पुणे व पिंपरी चिंचवडमधील वीज पुरवठा पूर्ववत ; टप्पाटप्प्याने वीज पुरवठा केला सुरळीत
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 7:27 PM

पुणे – महापारेषण कंपनीच्या लोणीकंद व चाकण या दोन अतिउच्च दाबाच्या 400 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये(Tower line) झाले. बिघाडामुळे आज (दि.9) पहाटे 4:30 च्या सुमारास पाच ठिकाणी ट्रिपींग आले होते. या तांत्रिक बिघाडामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच चाकण, वाघोली, लोणीकंद आदी ग्रामीण भागामध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यातील 80 टक्के भागात सकाळी 8:30  ते 12 वाजेपर्यंत व ऊर्वरित 20 टक्के भागात दुपारी 3:15  वाजेपर्यंत वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला. दरम्यान वीजपुरवठा विस्कळीत (Power outage) झाल्यानंतर महावितरण व महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपात्कालीन नियोजन केले. यामध्ये कोयनेमधील वीजनिर्मिती वाढविण्यात आली व त्याचा महापारेषणच्या जेजूरी 400 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात आला. जेजूरी उपकेंद्रातून महावितरणच्या विविध उपकेंद्रांना पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध झाल्यानंतर सकाळी 8:30  पासून वीजपुरवठा पूर्ववत करण्यास महावितरणकडून तांत्रिक उपाययोजना करण्यास वेगाने सुरवात झाली. यामध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत पुणे व पिंपरी चिंचवड (Pune and Pimpri Chinchwad ) शहर तसेच ग्रामीण परिसराच्या 80 टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यात प्रामुख्याने सर्वप्रथम रुग्णालये, पाणीपुरवठा योजना, घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला.

लाखो नागरिकांना बसला फटका

याबाबत माहिती मिळालेली माहिती पहाटेच्या सुमारास महापारेषणच्या लोणीकंद ते चाकण आणि चाकण ते तळेगाव या दोन्ही टॉवर लाईनच्या एकूण 5 सर्कीटमध्ये घटदाट धुकं व दवं यांचा परिणाम झाल्याने तांत्रिक बिघाड झाला होता. परिणामी महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या 400 केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. या उपकेंद्रांतून महावितरणच्या तब्बल 189 उपकेंद्रांना होणार वीजपुरवठा देखील ठप्प झाला. त्यामुळे पुणे शहरातील सुमारे 15 लाख 13 हजार, पिंपरी चिंचवड शहरातील 7 लाख 25 हजार तसेच लोणीकंद, वाघोली, चाकण या ग्रामीण परिसरातील सुमारे1 लाख 80 हजार अशा एकूण 24 लाख 18 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. तसेच महापारेषणच्या युद्धपातळीवरील दुरूस्ती कामामुळे टॉवर लाईनच्या पाच पैकी दोन सर्कीटच्या दुरूस्तीचे काम दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण झाले. त्यामुळे या दोन्ही सर्कीटवरून महावितरणच्या काही उपकेंद्रांना वीजपुरवठा सुरू झाला व उर्वरित भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यास आणखी वेग देण्यात आला.

या भागातील होती बत्तीगुल पुणे शहर अंतर्गत रास्तापेठ, बंडगार्डन, पर्वती, कोथरूड, नगररोड, शिवाजीनगर विभागामध्ये पर्यायी व्यवस्थेतून सकाळी 11:30  वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरु करण्यात आला तर पद्मावती विभागामध्ये 1 वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला. पिंपरी चिंचवड शहर अंतर्गत पिंपरी विभागामध्ये 12 वाजेपर्यंत संपूर्ण भागात वीजपुरवठा सुरु करण्यात आला. भोसरी विभागामध्ये सकाळी 10:15वाजेपर्यंत एमआयडीसी व घरगुती ग्राहकांसह सुमारे 55 टक्के भागात वीजपुरवठा सुरु करण्यात आला तर उर्वरित 45 टक्के भागात दुपारी 3:30वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला. यासोबतच ग्रामीण भागामध्ये लोणीकंद व वाघोली परिसरातील वीजपुरवठा सकाळी 9:45 च्या सुमारास सुरळीत करण्यात आला. तर महत्वाच्या चाकण एमआयडीसीमधील वीजपुरवठा देखील दुपारी 12:15  वाजता सुरु करण्यात आला.

या गोष्टींना केला जातो  पुरवठा विजेचा प्रवास- वीजनिर्मिती कंपन्यांकडून निर्माण केलेली वीज ही महापारेषण कंपनीच्या अति उच्चदाबाच्या टॉवर लाइनद्वारे त्याच कंपनीच्या 400केव्ही, 220 केव्ही व 132 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रांपर्यंत आणली जाते. या अतिउच्चदाब उपकेंद्रांमधून महावितरण कंपनीच्या 33 केव्ही, 22 केव्ही व 11 केव्ही उपकेंद्रांना वीजपुरवठा केला जातो व या उपकेंद्रांमधून निघणाऱ्या वीजवाहिन्या व रोहित्रांद्वारे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, शेती आदी सर्व वर्गवारीतील ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो.

IND vs WI: ‘ऐक, आम्हाला तुझ्याकडून…’ पंतला सलामीला पाठवण्याच्या प्रयोगावर गावस्कर म्हणतात…. Uttar Pradesh Assembly Election Voting 2022 Live Streaming: : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान; येथे जाणून घ्या प्रत्येक अपडेट

संजय राऊत तुम्हची जागा आता “आत”, धमक्या देण्याचे दिवस संपले; नारायण राणेंचा गर्भित इशारा

Non Stop LIVE Update
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.