AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अस्वच्छतेत पुणेकरांची आघाडी, २० दिवसांतच असे केले की…

Pune News | केंद्र सरकारकडून दरवर्षी स्वच्छ शहरांचे क्रमवारी जाहीर केले जाते. त्यात इंदूर पहिल्या क्रमांकावर आहे. इंदूरबरोबर सुरत शहर संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आले आहे. महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु पुणे शहर दहाव्या क्रमांकावर आहे. आता मनपाने...

अस्वच्छतेत पुणेकरांची आघाडी, २० दिवसांतच असे केले की...
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 21, 2024 | 8:33 AM
Share

अभिजित पोते, पुणे, दि. 21 फेब्रुवारी 2024 | पुणेकर अनेक गोष्टींमध्ये आघाडीवर असतात. त्यामुळे पुणे शहराची आणि पुणेकरांची चर्चा देशभर होत असते. पुणेकरांनी सुरुवात केलेल्या नावीन्यपूर्णतचे नेहमी इतरत्र कौतूक होत असते. परंतु पुणेकरांसाठी आज आलेली बातमी चांगली नाही. सर्व ठिकाणी आघाडी घेणाऱ्या पुणेकरांनी अस्वच्छतेसाठी आघाडी घेतली आहे. यासंदर्भातील गेल्या २० दिवसांतील आकडेवारी समोर आली आहे. यामुळे आता पुणेकरांना विचार करावा लागणार आहे आणि अस्वच्छतेविरुद्ध मोहीम सुरु करुन ही आघाडी मोडून काढावी लागणार आहे.

२२ लाख रुपये दंड भरला

अस्वच्छतेसाठीचा दंड भरण्यात पुणेकर अव्वल आले आहे. पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्‍या नागरिकांवर महापालिकेकडून दंड आकारण्यात येतो. पुणेकरांनी गेल्या २० दिवसांत तब्बल २२ लाख ८ हजार रूपयांचा दंड भरला आहे. शहरात अस्वच्छता करणाऱ्या ३ हजार ८ नागरिकांकडून पुणे महापालिकेने केला दंड वसूल केला आहे.

मनपाकडून नियमित होते स्वच्छता

शहरात महापालिकेकडून दररोज मोठया प्रमाणात स्वच्छता केली जाते. परंतु पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्‍या नागरिकांची संख्याही अधिक आहे. अशा नागरिकांवर महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून दैनंदिन स्वरूपात कारवाई केली जाते. त्यांच्याकडून २० दिवसांत तब्बल २२ लाख ८ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पुणे शहर होते दहाव्या क्रमांकावर

केंद्र सरकारकडून दरवर्षी स्वच्छ शहरांचे क्रमवारी जाहीर केले जाते. त्यात इंदूर पहिल्या क्रमांकावर आहे. इंदूरबरोबर सुरत शहर संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आले आहे. महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु सर्व गोष्टीत आघाडी घेणारे पुणे शहर दहाव्या क्रमांकावर आहे. यामुळे पुणे शहर स्वच्छ करण्याचा चंग मनपाने केला आहे. त्यासाठी इंदूरमध्ये जाऊन अभ्यास करण्यात आला आहे. त्याला आता पुणेकरांची साथ हवी आहे. त्यानंतर पुणे शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर होऊ शकते.

Follow Us
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
Delhi INDIA Alliance Rally : ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही... राहुल गांधींचा निर्धार; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी