Raj Thackeray : भोंगे ते अयोध्यावारी, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे

| Updated on: Apr 17, 2022 | 1:19 PM

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भोंग्याचा राग आळवला आहे. आम्ही कुणाच्याही प्रार्थनेविरोधात नाही. येत्या 3 तारखेपर्यंत आम्ही शांत आहोत. त्यानंतर आम्ही जशास तसे उत्तर देऊ.

Raj Thackeray : भोंगे ते अयोध्यावारी, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
भोंगे ते अयोध्यावारी, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भोंग्याचा राग आळवला आहे. आम्ही कुणाच्याही प्रार्थनेविरोधात नाही. येत्या 3 तारखेपर्यंत आम्ही शांत आहोत. त्यानंतर आम्ही जशास तसे उत्तर देऊ. तुम्ही तुमच्या अजान ऐकवता तर आम्हीही आमच्या आरत्या तुम्हाला ऐकवू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. राज ठाकरे यांनी यावेळी दोन मोठ्या घोषणाही केल्या. पहिली घोषणा म्हणजे, येत्या 1 मे रोजी ते औरंगाबादला (aurangabad) जाहीर सभा घेणार आहेत. दुसरी मोठी घोषणा म्हणजे ते अयोध्येला (ayodhya ram mandir) जाणार आहेत. येत्या 5 जून रोजी ते अयोध्यावारी करणार असून या दौऱ्याला सोबत येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यामुळे राज यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोजक्याच मुद्द्यांना हात घातला. मात्र, सरकारला इशारा द्यायलाही ते विसरले नाहीत.

भोंगे हा धार्मिक नव्हे, सामाजिक विषय

दोन घोषणा करायच्या आहेत. दोन गोष्टी सांगायच्या आहेत. ते बोलले की आम्ही बोलायचं. आम्ही बोलल्यावर ते बोलणार. पुन्हा आम्ही बोलायचं. मला वाटतं जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा अनेक गोष्टी मी बोलेन. लोकांना वाटतं की भोंग्याचा धार्मिक विषय आहे. पण मी भाषणात स्पष्ट केलं. हा सामाजिक विषय आहे. त्याकडे त्या अंगाने पाहावं. इथे मुस्लिम पत्रकार आहे. ते नांदगावकरांना भेटले आणि सांगितलं माझं लहान मुल जन्माला आलं, तेव्हा त्याला त्रास व्हायचा. सकाळची बांग आणि अजान दिल्या जायचा, मी स्वत: मशिदीत जाऊन त्यांना गोंगाट होतोय, तो बंद करा असं सांगितलं. हा त्रास केवळ हिंदूंना नाही मुस्लिमांनाही होतोय. हा विषय अनेक वर्षापासुन सुरू. पण तसाच आहे. पण पुढे गेला नाही. म्हणून तुम्ही दिवसातून पाच वेळा भोंगे लावणार असाल तर आम्ही मशिदी समोर पाचवेळा हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

पुन्हा 3 तारखेची डेडलाईन

देशातील सर्व हिंदूंना विनंती आहे . तयारीत राहा.आता रमजान आहे. त्यामुळे काही करायचं नाही. बोलायचंही नाही. पण 3 तारखेपर्यंत त्यांना कळलं नाही, समजलं नाही, तर या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा यांना याचा धर्म महत्त्वाचा वाटत असेल, लाऊडस्पीकर मोठे वाटत असेल तर त्यांना जशास तसं उत्तर देणं आवश्यक आहे. आमची तयारी सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात दंगली नकोय

या देशात, महाराष्ट्रात दंगली नकोय. हाणामारी नकोय. या देशातील महाराष्ट्रातील शांतता भंग करायची नाही. तशी इच्छा नाही. पण माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यांच्या प्रार्थनेला विरोध केलेला नाही. पण त्यांना लाऊडस्पीकरवरूनच ऐकवायचं असेल तर आमच्याही आरत्या त्यांना लाऊडस्पीकरवरून ऐकाव्या लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

औरंगाबादला सभा

यावेळी राज ठाकरे यांनी औरंगाबादला सभा घेणार असल्याची घोषणा केली. येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादचं सांस्कृतिक मंडळाचं मैदान आहे. तिथे माझी जाहीर सभा घेणार आहे, असं राज म्हणाले.

चलो अयोध्या

राज ठाकरे यांनी आज अखेर अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. येत्या 5 जून रोजी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहे. अयोध्येला जाऊन दर्शन घेणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Raj Thackeray : येत्या 5 जून रोजी अयोध्येला जाणार, राज ठाकरे यांची मोठी घोषणा

Raj Thackeray : देशातील हिंदूंनो तयार राहा, 3 तारखेपर्यंत त्यांना कळलं नाही तर जशास तसे उत्तर देऊ; राज ठाकरे पुन्हा आक्रमक

Raj Thackeray : तर दिवसांतून पाचवेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू; राज ठाकरेंचा इशारा