पुणेकरांनो, थर्टी फर्स्टला जेवणाची डिलिव्हरी मागवताय? निर्बंधाची नवीन वेळ

| Updated on: Dec 31, 2020 | 9:10 AM

पुणे महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रात्री 10.45 पर्यंतच खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी सुरु राहील. | food home delivery

पुणेकरांनो, थर्टी फर्स्टला जेवणाची डिलिव्हरी मागवताय? निर्बंधाची नवीन वेळ
Follow us on

पुणे: नववर्षाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना पुणेकरांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. कारण, पुणे महानगरपालिकेने 31 डिसेंबरला (31St December) खाद्यपदार्थांच्या घरपोच डिलिव्हरीवर (Food Home Delivery) निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आता पुणेकरांना रात्री 11 नंतर घरगुती बेत आखूनच थर्टी फस्ट साजरा करावा लागणार आहे. (food home delivery ban in Pune on 31st december)

पुणे महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रात्री 10.45 पर्यंतच खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी सुरु राहील. त्यानंतर पुणेकरांना कोणतेही खाद्यपदार्थ घरपोच मिळणार नाहीत. याशिवाय, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तराँ तसेच बार 31 डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहेत. नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना काय काळजी घ्यावी यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी आदेश जारी केला आहे.

थर्टी फर्स्टला तळीरामांवर करडी नजर; दारू पिऊन गाडी चालवल्यास थेट रक्त तपासणी

नववर्षाच्या निमित्ताने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी करु नये, असे आवाहन ठिकठिकाणी करण्यात येत आहे. 31 डिसेंबरला रात्री दारु पिऊन गाडी चालवू नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मुंबई पोलीस रस्त्यावर तैनात असणार आहे. त्यामुळे जर कोणी रस्त्यावर दारु पिऊन गाडी चालवली, तर त्याची थेट रुग्णालयात पाठवून ब्लड टेस्ट केली जाणार आहे.

31st ला मार्गशीर्षातील गुरुवार, कोल्हापूरकरांची मांसाहाराकडे पाठ, चिकन-मटण बाजार ओस

नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात सगळेच सज्ज आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंधनं असली तरी घरच्या घरी सेलिब्रेशनचे बेत आखले जात आहेत. कुठे ओली पार्टी विरुद्ध सुकी पार्टी असे दोन गट-तट पडले आहेत. त्यातच मार्गशीर्ष महिन्यामुळे 31 डिसेंबरला शाकाहाराचा प्लान करण्यावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. एरवी तांबडा-पांढरा रस्सा भुरकण्यासाठी चढाओढ करणारे कोल्हापूरकर यंदा थंड दिसत आहेत. त्यामुळे करवीरनगरीत चिकन-मटण बाजार ओस पडले आहेत. यावर्षीचा थर्टी फर्स्ट मार्गशीर्ष महिन्यात आल्यामुळे अनेक खवय्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे.

संबंधित  बातम्या:

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तासाला 800 भाविकांना घेता येणार सिद्धीविनायकाचे दर्शन

थर्टी फर्स्टला तळीरामांवर करडी नजर; दारू पिऊन गाडी चालवल्यास थेट रक्त तपासणी

Maharashtra Lockdown Extended | राज्यात 31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय

(food home delivery ban in Pune on 31st december)