शरद पवारांवर टीका करण्याशिवाय पर्याय नाहीच; चंद्रकांत पाटलांची कबुली, म्हणाले….

| Updated on: Feb 01, 2021 | 10:04 AM

आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात काम वाढवायचं असेल तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नाही, असे चंद्रकातं पाटील म्हणाले. (Sharad Pawar Chandrakant Patil)

शरद पवारांवर टीका करण्याशिवाय पर्याय नाहीच; चंद्रकांत पाटलांची कबुली, म्हणाले....
शरद पवार आणि चंद्रकांत पाटील
Follow us on

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) हे राज्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी असल्याचे म्हटले आहे. राज्यात राजकारण करायचं असेल तर, पवारांवर टीका करण्याशिवाय पर्याय नाही, असंही अनेकदा म्हटलं जातं. त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. पक्ष वाढवायचा असेल तर पवारांवर टीका करावीच लागेल, अशी कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलीय. “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, ती आमची संस्कृती आहे. मात्र, आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात काम वाढवायचं असेल तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नाही, त्यांच्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. (for the growth of party we have to criticize Sharad Pawar said Chandrakant Patil)

“शरद पवार यांच्यावर आम्ही टीका केली असली तरी, राजकारणात मैत्री असायलाच हवी. आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात काम वाढवायचे असेल तर शरद पवार यांच्यावर टीका करावी लागेल. त्यांच्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय आमचा पक्ष वाढूच शकत नाही,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते समोर आले की मी त्यांनी वाकून नमस्कार करणारच; ती आमची संस्कृती आहे, असेही पाटील म्हणाले.

हा शरद पवारांचा आडमुठेपणा

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांवरुन देशात मोठं राजकारण सुरु आहे. दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोधकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत, केंद्राने कुठल्याही चर्चेविणा कृषी कायदे मंजूर केले आहेत, असा आरोप केलाय.

पवारांनी संसदेत उपस्थित नव्हते

पवारांच्या या आरोपावर बोलताना शरद पवार यांची ही भूमिका योग्य नसल्याचं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पवार यांच्यावर टीका केलीये. “केंद्राने आणखी काय करावं हे मलाही कळत नाहीये. कृषी कायद्यांची अंमलबजावणी दीड वर्षांसाठी थांबणार आहेत. या काळात शेतकऱ्यांशी चर्चा होऊ शकते, विरोधकांना विश्वासात घेतलं जाऊ शकतं. ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभामध्ये हे कायदे संमत झाले, त्यावेळी शऱद पवार दिल्लीमध्ये नव्हते. त्या दिवशी पवारांनी संसदेत असायला हवं होतं,” असे चंद्रकांत म्हहणाले. तसेच, निवडणुकीत विजय न मिळाल्यामुळेच सरकारला त्रास देण्याचे काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.

संबंधित बातम्या :

Farmer Protest : ‘शरद पवारांकडून खोटा प्रचार, नव्या कायद्यांमुळे APMCवर परिणाम नाही’, कृषी मंत्र्यांचा पलटवार

अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्व; मुणगेकरांची खोचक टीका

दिल्लीतील हिंसाचारानंतरही मोदी-शहा गप्प का?; संजय राऊतांचा सवाल

(for the growth of party we have to criticize Sharad Pawar said Chandrakant Patil)