हटके पुणेकर, मित्र सरपंच झाल्यावर चक्क दिली ‘फॉर्च्यूनर’ची अनोखी भेट

पुणे जिल्ह्यात असलेल्या केसनंद गावातून दत्तात्रय हरगुडे सरपंच झाले. त्यांना सरपंच पद मिळताच थेट फॉर्च्युनर कार भेट मिळाली. ही गाडी सर्व मित्रांनी  मिळून दिली. पुणे जिल्ह्यातील गाडीच्या बातमीची जोरदार चर्चा आहे.

हटके पुणेकर, मित्र सरपंच झाल्यावर चक्क दिली 'फॉर्च्यूनर'ची अनोखी भेट
सरपंचला मित्रांनी फॉर्च्यूनर कार भेट दिली.
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 9:20 AM

पुणे : पुणेकर नेहमी हटके असतात. काहीही वेगळे करण्यात त्यांचा हात कोणीही धरु शकत नाही. मग त्या पुणेरी पाट्याच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचा विषय असो की राजकीय…आता पुणे जिल्ह्यातून अशीच आगळीवेगळी बातमी आली आहे. मित्र सरपंच झाला म्हणून दुसऱ्या मित्राने सुमारे ३५ ते ४० लाखांची फॉर्च्युनर (fortuner )गाडी भेट दिली. पुणे जिल्ह्यात असलेल्या केसनंद गावातून दत्तात्रय हरगुडे सरपंच झाले. त्यांना सरपंच पदमिळताच थेट फॉर्च्युनर कार भेट मिळाली. ही गाडी सर्व मित्रांनी  मिळून दिली. पुणे जिल्ह्यातील गाडीच्या बातमीची जोरदार चर्चा आहे. पुणे जिल्ह्यातील केसनंद ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन हरगुडे आणि उपसरपंच अक्षदा हरगुडे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर रिक्त पदासाठी पुन्हा निवडणूक झाली. त्यानंतर सरपंच पदावर दत्तात्रय हरगुडे यांची बिननिवड झाली. त्यांच्या या निवडीनंतर मित्रांनी जोरदार जल्लोष केला.मित्रांचा हा जल्लोष साधा नव्हता. तेरी मेरी यारी म्हणत सर्व मित्रांनी चक्क दत्तात्रय यांना थेट फॉर्च्यूनर कारच भेट दिली आहे.

एक मित्र सरपंच झाला तेव्हा मित्रांचा आनंदोत्सव असतोच. सोबत पार्टीही असतेच. जल्लोष असतो.मित्रांनी नाच-नृत्य, धमाल मस्ती केली. त्यानंतर मित्रांनी सरपंच झालेल्या दत्तात्रय यांच्या दारात एक नवीन चमकणारी फॉर्च्युनर गाडी लावली. मित्रांकडून एवढी मोठी भेट मिळाल्याने सरपंच झालेले दत्तात्रय हरगुडे भावूक झाले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणतात मित्र :

आमचा आबा हा कधीही स्वतःवर खर्च करत नाही.त्याने समाजासाठी खूप केले. गावासाठी खूप केले. परंतु स्वतःवर जो खर्च करायचा आहे तो तयार नसतो. त्यामुळे आम्ही सगळ्या मित्रांनी त्याच्यासाठी काहीतरी करावे, हा निर्णय घेतला. आबा नेहमी साध्या गाडीतून प्रवास करत होतो. त्यामुळे आम्ही सर्वांनी त्यांच्यांसाठी काही तरी करण्याचा निर्णय घेतला आहे अन् त्यांना फॉर्च्यूनर गाडीची भेट दिली.

मित्रांच्या प्रेमानंतर काय म्हणाले हरगुडे “सरपंचपदी निवड झाल्यामुळे मला मित्रांनी फॉर्च्यूनर कार गिफ्ट दिली. मित्रांच्या या प्रेमामुळे मला खूप आनंद झाला आहे. आता माझी जबाबदारी वाढली आहे. मी गावाच्या विकासासाठी १०० टक्के प्रयत्न करेन, असं म्हणत दत्तात्रय हरगुडेने मित्रांचे आभार मानले.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.