पोहणे शिकायला भिमा नदीच्या पात्रात सात मित्र उतरले, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांच्या जीवावर बेतले

गौरव हा पाण्यात पोहणे शिकत होता. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी अनुराग गेला. मात्र त्याला घट्ट पकडल्याने दोघेही बुडाले.

पोहणे शिकायला भिमा नदीच्या पात्रात सात मित्र उतरले, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांच्या जीवावर बेतले
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 5:26 PM

सुनील थिगळे, प्रतिनिधी, पुणे : उन्हाळ्याचे दिवस आहेत. सूर्यनारायण चांगलाच कोपत आहे. गारवा मिळण्यासाठी पाण्यात बुडावेसे वाटते. पण, नदीत आंघोळ करण्याची मजा काही औरचं. त्यामुळे नदीत जाऊन पाण्यात पोहण्याचा आनंद काही जण घेत असतात. पण, ज्यांना पोहता येत नाही, अशांची अडचण होते. अशा दोन दुर्घटना समोर आल्या आहेत. कोरेगाव भिमा नदीपात्रात दहावीत शिकणारे दोन मुलं बुडून मरण पावले. तर दुसऱ्या एका घटनेत सुमारे १७ वर्षे वयोगटातील दोन मित्र पाण्यात बुडाले.

पोहणे शिकण्यासाठी गेले ते शेवटचेच

नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सात विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील भीमा नदी पात्रात घडली आहे. यामध्ये गौरव स्वामी आणि अनुराग मांदळे या दोघांचा बुडून मृत्यू झाला. ते दहाव्या वर्गात शिकत होते. तब्बल 24 तासानंतर त्यांचे मृतदेह सापडले.

हे सुद्धा वाचा

गौरव हा पाण्यात पोहणे शिकत होता. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी अनुराग गेला. मात्र त्याला घट्ट पकडल्याने दोघेही बुडाले. यात दोघांचाही मृत्यू झाला.

तापी नादीत बुडून दोघांचा मृत्यू

दुसऱ्या एका घटनेत, भुसावळ येथील तापी नदीत सतरा वर्षीय दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वाढत्या तापमानामुळे सायंकाळी मित्रांसमवेत नदीत होण्यासाठी गेलेल्या दानिश शेख आणि अंकुश ठाकूर या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले

दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत दोघांचेही मृतदेहच सापडले. दोन्ही मुलांचे अंदाजे वय 17 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही जण भुसावळ शहरातील खडका रोड परिसरातील रहिवासी आहेत.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.