AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करू नका, जसा बाप तशीच लेक’; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका

लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करूच नका. जसा बाप तशीच लेक, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

'लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करू नका, जसा बाप तशीच लेक'; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 06, 2024 | 11:17 PM
Share

शिंदे तुझसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही, असे आदेश खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांच्या बैठकीत दिल्याचा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली पाहिजे, कारण त्यांचे नाव घेऊन महायुतीमध्ये संभ्रम केला जात असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता यात वेळीच हस्तक्षेप करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच नाव घेऊन इथ महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. शरद पवार हे जातीयवादाच विद्यापीठ आहे. सुप्रिया सुळे ह्या लहानपणीपासून त्यांच्याकडूनच हे सगळ शिकल्या आहे. लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करूच नका. जसा बाप तशीच लेक, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

पुरोगामीपणाच्या बाता हाणायच्या आणि जातीयवादीच्याच चर्चा घडवायच्या हे पवारांचे जुनेच फॅार्म्यूले आहेत. सुप्रिया सुळे अजित दादांवर सहानुभूती दाखवू नका असं बोलतात. अजित पवार तिकड लाडकी बहिण योजनेसाठी राज्यभरात फिरत आहेत. पण इथ सुप्रिया सुळे त्यांच्यातली ‘किडकी बहिण ‘ महाराष्ट्राला दाखवत आहेत, असं म्हणत पडळकरांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेनंतर सुप्रिया सुळे यांनी आपण असे काही बोलले नसल्याचं म्हटलं आहे. हे वक्तव्य मी कुठे केले याचा व्हिडीओ दाखवा, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...