AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TET Exam Scam : टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी प्रितिष देशमुखला जमीन मंजूर ; अटींचे करावे लागणार पालन

प्रितिष देशमुख  घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी 22  डिसेंबर 2021 ला अटक केली होती. टीईटी परीक्षेसाठी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. याचाच फायदा घेत आरोपीने दलालाच्या मदतीने अपात्र उमेदवारांना पात्र केल्याच्या गैरव्यवहारात आढळून आले.

TET Exam Scam : टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी प्रितिष देशमुखला जमीन मंजूर ; अटींचे करावे लागणार पालन
पुणे पोलीस
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: May 15, 2022 | 10:36 AM
Share

पुणे- शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील (TET Exam Scam)आरोपी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रितिष देशमुख याला पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 50  हजाराच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. याबरोबरच देश सोडून कुठेही जाऊ नये व पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल ना करण्याच्या अटीवर जमीन मंजूर करण्यात आला आहे.  टीईटी परीक्षा घोटाळा उघड झाल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) प्रितिष देशमुखची उचलबांगडी केली होती. त्यानंतर तपासामध्ये प्रितिष देशमुख  (Pritish Deshmukh)घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी 22  डिसेंबर 2021 ला अटक केली होती. टीईटी परीक्षेसाठी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. याचाच फायदा घेत आरोपीने दलालाच्या मदतीने अपात्र उमेदवारांना पात्र केल्याच्या गैरव्यवहारात आढळून आले.

असा केला घोटाळा

टीईटी परीक्षेत दलालांच्या मार्फत आलेल्या बनावट विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कोरे ओएमआर ठेवण्यास सांगितले जात. त्यानंतर ओएमआरमध्ये बदल करायचे यातून कोणी सुटून गेल्यास नापासला पास दाखवायचे. अशाप्रकारे जवळपास 500 अधिक विद्यार्थ्यांना पास करण्यात आल्याचे माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली होती.

या आरोपीचाही समावेश

टीईटी घोटाळ्यात ए. सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रितिष देशमुख. परीक्षा परिषदेचे प्रमुख सुखदेव डेरे, तुकाराम सुपे हे मुख्य आरोपी आहेत. पोलिसांना तपास करताना आढळून आलेल्या लॅपटॉपमधून माहिती मिळाली. त्यानंतर हा घोटाळा उघड झाला. पुणे पोलिसांनी या घोटाळ्याचा तपास आक करत असताना आतापर्यंत तुकाराम सुपे ,अश्विन कुमार,अभिषेक सावरिकर,सुखदेव डेरे ,सौरभ त्रिपाठी यांच्यासह आणखी एकाला अटक केली आहेत. याबरोबरच तुकाराम सुपेचे एकूण 3 कोटी 93 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख अश्विनकुमारच्या बंगलोरच्या घरातून 24 किलो चांदी, 2 किलो सोनं आणि काही हिरे पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत. टीईटी घोटाळा प्रकरणात अंदाजे 900 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?