AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update | येत्या २४ तासांत मुसळधार, हवामान विभागाने कुठे दिला ऑरेंज अलर्ट

monsoon rain update | सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवशीही राज्यात चांगला पाऊस होणार आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हवामान विभागाने काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Rain Update | येत्या २४ तासांत मुसळधार, हवामान विभागाने कुठे दिला ऑरेंज अलर्ट
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 12:13 PM

पुणे | 30 सप्टेंबर 2023 : राज्यात यंदा मान्सून उशिराने दाखल झाला. आज पावसाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे. या महिन्यात राज्यात सर्वच भागांत चांगला पाऊस झाला. यामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढला. अनेक शहरांचा पाणी प्रश्न मिटला तसेच रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. शनिवारी पुणे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे हा पाऊस पडणार आहे.

कुठे पडणार मुसळधार पाऊस

अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गोव्यापासून कोकण किनारपट्टीपर्यंत हवामान विभागाने आँरेज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांच्या अनेक बोटी बंदरातच असल्याने त्यांच्यापुढे संकट निर्माण झाले आहे. येत्या २४ तासांत चक्रीवादळाची परिस्थिती वाढणार आहे. बदललेल्या परिस्थितीमुळे सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने सरासरी गाठली आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात कुठे दिला अलर्ट

हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर राज्यातील इतर भागांत मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात कुठेही अलर्ट दिला नाही. राज्यातील उर्वरित भागांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.  दोन दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या सर्वच भागांत पावसाचा अलर्ट दिला आहे.

नाशिक जिल्ह्यांत मुसळधार

नाशिक जिल्ह्यातील मुकणे धरण शिवारात शुक्रवारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी सांजेगाव ते कावनई या दोन गावांमध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी चक्रीवादळासारखी वावटळ धरणात फिरताना दिसत होती. त्यावेळी धरणाचे पाणी आकाशात उडत होते. स्थानिक गावकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ही दृश्य कैद केली आहेत.  तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांचा जलसाठाही वाढला आहे.

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.