AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे शहरात ‘गटारी’निमित्त खवय्यांकडून हजारो किलो मटण, मासळी फस्त

gatari amavasya : आषाढ महिन्याचा शेवटच्या दिवशी मांसाहारी पदार्थांवर पुणेकरांनी ताव मारला. यामुळे रविवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मांसाहारी पदार्थांच्या दुकानांवर गर्दी झाली. पुणे परिसरात असलेले पर्यटनस्थळेही गर्दीने गजबजली होती.

पुणे शहरात ‘गटारी’निमित्त खवय्यांकडून हजारो किलो मटण, मासळी फस्त
poultry farm
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 17, 2023 | 10:01 AM
Share

रणजित जाधव, पुणे | 17 जुलै 2023 : आषाढ महिन्याचा शेवटचा रविवारी काल होता. त्यानंतर श्रावण महिना सुरु आहे. यंदा आधिक महिना आलाय. श्रावण अन आधिक महिन्याला धार्मिकदृष्ट्या महत्व असते. यामुळे या महिन्यांमध्ये अनेक जणांकडून मांसाहारी पदार्थ सेवन केले जात नाही. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी १६ जुलै रोजी गटारी अमावस्या होती. त्यासाठी मांसाहारी पदार्थ खाण्यासाठी खवय्यांनी गर्दी केली होती. मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी पुणे शहरातील बाजारात खवय्यांची गर्दी झाली होती. पुणेकरांनी रविवारी हजारो किलो मटण, चिकन फस्त केले.

किती झाली विक्री

पुणेकरांनी ४५ टन मासळी, 2 हजार बोकडांचे मटण रविवारी फस्त केले. आषाड महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने नागरिकांनी सकाळपासूनच मटण, मासळीच्या दुकानासमोर मोठ्या रांगा लावल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या दुकानांवर गर्दी होती. गटारी अन् आलेला रविवार यामुळे लोणावळासह अनेक पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल होते. गटारी आणि वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले. कोसळणारे धबधबे आणि कधी रिमझिम तर कधी धो धो कोसळणाऱ्या पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात आले होते. वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

गर्दीमुळे दरवाढ

चिकन, मटणाची मागणी वाढल्यामुळे दरवाढ झाली होती. बकऱ्याचे मटण किलोमागे शंभर रुपयांनी वाढले होते. मासळी, चिकन यांच्या दरातही वाढ झाली होती. पुणे, मुंबईत चांगलीच मागणी होती. दर वाढ झाल्यानंतरही ग्राहकांकडून चिकन, मटण अन् मासळी यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. अनेकांनी हॉटेलमध्ये जाऊन मांसाहारी पदार्थांवर ताव मारला. अनेकांनी ऑनलाइन बुकींग करुन घरीच मांसाहारी पदार्थ मागवून घेतले. त्यामुळे फूड डिलेव्हरीची उलाढाल वाढली होती.

आता अडीच महिने मांसाहार बंद

यंदा आधिक महिना आलेला आहे. यामुळे आषाढ महिन्यानंतर आधिक, त्यानंतर श्रावण मग नवरात्रोत्सव येणार आहे. यामुळे अनेक जण आता सुमारे अडीच महिने मांसाहारी पदार्थांचे सेवन बंद करतील. मांसाहारी खवय्यांना आता शाकाहारी भोजनाचा आस्वाद घ्यावा लागणार आहे.

Follow Us
मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
Moshi Building Collapsed | मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
'मातोश्री'बंगल्यावरही बंगाली बाबा... विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलता
'मातोश्री' बंगल्यावरही बंगाली बाबा... विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलताना नेत्याचा मोठा खुलासा!
एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना...
एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना... FDA ची धडक कारवाई
2 कोटींचा दबाव टाकला आणि...गिरीजा राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
Girija Raut | 2 कोटींचा दबाव टाकला आणि...गिरीजा राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
अमित शहांनी खरंच एकनाथ खडसेंना कॉल केला होता? भाजप नेत्यांचं उत्तर
अमित शहांनी खरंच एकनाथ खडसेंना कॉल केला होता? भाजप नेत्यांची प्रतिक्रिया तुफान चर्चेत
अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
मोठी बातमी! अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं सांगितली लग्नानंतरची प्रत्येक घटना
विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर....
Vinayak Raut | विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले...
गोमूत्र प्यायला दिलं अन् डोक्यावरचे केस... विनायक राऊतांच्या सूनेचा...
गोमूत्र प्यायला दिलं अन् डोक्यावरचे केस... विनायक राऊतांच्या सूनेचा हादरवणारा दावा; थेट....
विनायक राऊत अडचणीत! सुनेचे धक्कादायक आरोप; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
Vinayak Raut | विनायक राऊत अडचणीत! सुनेचे धक्कादायक आरोप; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल