AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune School | पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये इयत्ता पहिली ते 8 वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू होणार; कोरोना निर्बंधात तूर्तास शिथिलता नाही – अजित पवार यांची घोषणा

पुणे जिल्ह्यात सद्यस्थितीला 45 टक्के रुग्णसंख्या आहे. रुग्णसंख्येत घट झाली असली तरी घाईत निर्णय घेणार नाही. अजून एकदोन आठवडे थांबूनच मगच कोरोना निर्बंधाच्या शिथिलते बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे माहिती पवार यांनी दिली.

Pune School | पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये इयत्ता पहिली ते 8 वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू होणार; कोरोना निर्बंधात तूर्तास शिथिलता नाही - अजित पवार यांची घोषणा
Pune Ajit Pawar
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 12:10 PM
Share

पुणे – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णसंख्या बघून शाळांबाबतच निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून शहरातील पहिली ते 8 वीपर्यंतच्या शाळा (School )हाफ डे पद्धातीने सुरु केल्या होत्या. मात्र आता हाफ डे बंद करून पूर्णवेळ शाळा सुरू करणार, हा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy CM Ajit Pawar )  यांनी दिली आहे. शाळांचा हा निर्णय फक्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad )पूरता मर्यादित असल्याचेही त्यांनी संगितले आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यावेळी यांनी येरवडा येथील शास्त्रीनगरमध्ये स्लब कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबतचाही आढावा घेत माहिती दिली यामध्ये दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरातील कोरोनाची सद्यस्थिती शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. दुसरीकडं जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटत असताना मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. यामागची कारण शोधण्याचं काम डॉक्टर करत आहेत. मागच्या लाटेच्या तुलनेत मृत्यू संख्या वाढले असल्याचेमत त्यांनी नोंदवली. शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मागील आठवड्याच्या तुलनेत नवीन रुग्णसंख्येत 42 टक्क्यांनी घट झाली आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींसाठी जेवढी लस पाहिजे तेवढी नाही. आजही लसीकरण झालं नाही. उद्याही होणार नाही. सोमवारी लस मिळेल. मुंबईला गेल्यावर केंद्राशी संपर्क साधून लस मिळवण्याचा प्रयत्न करतो. कोविड सेंटर बंद आहे. त्याला भाडं द्यावं लागत आहे. मात्र, 28 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहून मार्चमध्ये रुग्णसंख्येचा आढावा घेऊन निर्णय घेऊ असं ठरलं आहे.

कोरोना निर्बंधामध्ये तूर्तास शिथिलता नाही पुणे जिल्ह्यात सद्यस्थितीला 45 टक्के रुग्णसंख्या आहे. रुग्णसंख्येत घट झाली असली तरी घाईत निर्णय घेणार नाही. अजून एकदोन आठवडे थांबूनच मगच कोरोना निर्बंधाच्या शिथिलते बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे माहिती पवार यांनी दिली. याबरोबरच जिल्ह्यात तसेच महानगरपालिकांच्या हद्दीत होणाऱ्या बैलगाडा शर्यत , खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी परवानग्या मी मागितल्या जात आहेत. मात्र त्याच्या हद्दीतील प्रशासनाने परवानगी द्यायची की नाही तो निर्णय घ्यायचा असल्याचेही ते म्हणाले आहेत. आमदार, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.

Nashik Murder Mystery| डॉ. सुवर्णा वाजेंना पतीनेच थंड डोक्याने जिवंत का जाळले, भीषण खुनाचे गूढ अखेर उकलले!

निलंगा ताडमुगळीमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल, मंदिरात नारळ फोडल्याने कुटुंबाचा बहिष्कार

मेरे बाप को मोबाइल पर फोटो भेजता है? तोंडात शिव्या, हातात तलवार, मुख्याध्यापकांवर सपकन्… औरंगाबादमध्ये थरार!

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.