AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळजी घ्या ! पुण्यात कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा 100 पार केलीय ; साथीच्या रोगाचे प्रमाणही वाढले

शहरातील रुग्णसंख्येने आता शंभरीचा आकडा पार केला आहे. काल (17 नोव्हेंबरपर्यंत) रुग्णांची आकडेवारी 107 इतकी वाढली आहे. सातत्याने वाढत असलेली रुग्णसंख्या महापालिका प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे.

काळजी घ्या ! पुण्यात कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा 100 पार केलीय ; साथीच्या रोगाचे प्रमाणही वाढले
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Nov 18, 2021 | 10:43 AM
Share

पुणे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शहरातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट झाली होती. दिवाळीत तर रुग्णसंख्या अगदी शून्यावर आली होती, मात्र दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरातील रुग्णसंख्येने आता शंभरीचा आकडा पार केला आहे. काल (17 नोव्हेंबरपर्यंत) रुग्णांची आकडेवारी 107 इतकी वाढली आहे. सातत्याने वाढत असलेली रुग्णसंख्या महापालिका प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे.

आकडेवारी काय सांगते

  • महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या 843 इतकी आहे.
  •  काल दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  • आजपर्यंत शहरात 9 हजार 88 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • शहरातील विविध रूग्णालयांमध्ये 100 गंभीर रूग्णांवर तर 67 रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
  • आज दिवसभरात 69 कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
  • शहरात आतापर्यंत36 लाख 29 हजार 558जणांची कोरोना तपासणी करण्यात आली.
  • यातले 5लाख 5 हजार 619 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी 4लाख 95 हजार 682जण कोरोनामुक्त झाले आहेत.

साथ रोगाचेही वाढतंय प्रमाण

दिवाळीपासून सातत्याने हवामानात बदल होत आहे. इतकंच नव्हेतर ठिकठिकाणी अवकाळी पाऊसही पडत आहे. या सगळ्याच्या परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत दिसून आला आहे. हवामान बदल व पाऊस यामुळे साथीचे आजार पसरत आहेत. सर्दी, खोकला ,ताप हे लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तसेच डेंग्यूचे रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. राजगुरूनगर येथे एकाच दिवशी शहरातमध्ये 11 रूग्ण आढळून आले आहेत.  बदलत्या हवामानात नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

पुणे म्हाडाच्या लॉटरीत अर्ज करताय? वाचा मुख्य शहरातून म्हाडाचे प्रकल्प किती अंतरावर

Waqf Board land scam case: पुण्याचे उपजिल्हाधिकारी अजय पवार ED समोर हजर

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; पोलीस भरती लेखी परीक्षा १९ नोव्हेंबरला, १९ हजार ०३१९ उमेदवार देणार परीक्षा

Follow Us
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा