AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Cricket Team : पाकिस्तानची पुन्हा जगासमोर लाज निघाली, एकीने पाय पकडले, दुसरी उलटी झाली… संघाची विचित्र ट्रेनिंगचा Video Viral

Pakistan Cricket Team Pratice Video: पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा सराव करतानाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यानंतर पाकिस्तानची जगासमोर नाचक्की झाली आहे.

Pakistan Cricket Team : पाकिस्तानची पुन्हा जगासमोर लाज निघाली, एकीने पाय पकडले, दुसरी उलटी झाली... संघाची विचित्र ट्रेनिंगचा Video Viral
| Updated on: Sep 30, 2026 | 8:41 AM
Share

Pakistan Cricket Team : पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाच्या विचित्र लष्करी सरावाच्या कवायती आणि मैदानातील खराब क्षेत्ररक्षणाच्या कथा नेहमीच चर्चेत असतात, पण आता पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाचा एक अतिशय विचित्र आणि मजेशीर सरावाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रशिक्षण पद्धतींवर टीका केली आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, चार खेळाडू एकमेकांचे हात आणि पाय धरून एक विचित्र मानवी साखळी तयार करताना दिसत आहेत. एक खेळाडू खाली बसलेली आहे, दुसरी हवेत तरंगत आहे आणि उरलेल्या दोघी तिला आधार देत आहेत. हा व्हिडिओ पाहणारे चाहते विचारत आहेत की, अशा व्यायामाचा किंवा सर्कसमधील कसरतींचा क्रिकेटमधील टायमिंग, झेल किंवा फिटनेसशी काय संबंध आहे. सुरुवातीला हा वरिष्ठ महिला संघाचा सराव असल्याचे वृत्त असले तरी, प्रत्यक्षात हे पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील महिला संघाच्या सरावातील एक दृश्य असल्याचे वृत्त आहे.

सोशल मीडियावर आपल्या स्पष्टवक्त्या मतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आकाश चोप्राने या व्हिडिओद्वारे पाकिस्तान क्रिकेटच्या नव्या प्रयोगांवर टीका केली आहे. आकाश चोप्राने गंमतीने सुचवले की, पाकिस्तान क्रिकेट आता खेळापेक्षा विनोदाचा विषय जास्त बनत चालले आहे. तो म्हणाला की, पाकिस्तानचा पुरुष संघ त्यांच्या अनोख्या शिबिरांमुळे आणि क्षेत्ररक्षणाच्या सरावामुळे आधीच ट्रोल झाला आहे, आणि आता असे दिसते की महिला संघानेही त्याचेच अनुकरण केले आहे.

पाकिस्तान क्रिकेटमधील या विचित्र घटनांमुळे नेहमीच त्यांची नाचक्की होते. आकाश चोप्राने अशीही टिप्पणी केली की, जग चंद्रावर पोहोचले आहे, पण पाकिस्तान अजूनही तिथेच अडकले आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये असे प्रकार होत असतात यामुळे त्यांचे प्रयत्न कमी पडतात. यामुळे मोठ्या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ योग्य सराव करु शकत नाही. पाकिस्तानच्या सराव करण्याच्या पद्धतीवर नेहमचीच जगात हशा उडवली जाते.

Follow Us
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा