Gold Market: सोने खरेदीवर 5 हजार ते 70 हजारांची बचत! सोन्याच्या वाढत्या किंमतीत ग्राहकांची अनोखी शक्कल
Gold Market Cash Sales Surge: गेल्या दोन वर्षात सोन्याने रेकॉर्डब्रेक मजल मारली आहे. सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच कराचाही मोठा मारा आहे. अशावेळी ग्राहकांनी शक्कल लढवली आहे. यामुळे सरकारला आर्थिक फटका बसत आहे.

Gold Price Today: देशभरात गेल्या दोन वर्षांत सोन्याने किंमतीत रेकॉर्डब्रेक झेप घेतली. सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे. अर्थात यामुळे सोन्याची आयात कमी झालेली नाही. सोन्याची मागणीही कमी झालेली नाही. महागडे सोने आणि करांचा बोजा यावर ग्राहकांनी आणि सराफा दुकानदारांनी उपाय शोधला आहे. पक्क्या बिलाऐवजी कच्चा बिलावर सोन्याची बाजारपेठ तेजीच्या हिंदोळ्यावर स्वार आहे. या युक्तीमुळे ग्राहकांवरील कराचे ओझे कमी झाले आहे. चार पैसे वाचल्याचा त्यांना आनंद आहे. पण सरकारला यामुळे आर्थिक फटका बसत आहे.
ग्राहकांना 5000 रुपयांची सूट
सराफा बाजारातील काही व्यापाऱ्यांच्या मते, सोने रोखीत खरेदी केल्यास ग्राहकांना जवळपास 6 टक्क्यापर्यंत फायदा मिळतो. त्याचे पैसे वाचू शकतात. नगद रुपये देऊन सोने खरेदी केल्यास कर वाचवता येतो. काही दाव्यानुसार, 10 ग्रॅमच्या सोने खरेदीवर जवळपास 5,000 रुपयांची बचत होते. पण या सोने खरेदीची पक्की पावती मिळत नाही. कच्च्या पावतीवर हा हिशेब मांडावा लागतो. यामुळे मोठ्या सोने खरेदीवर जवळपास 60 से 70 हजार रुपयांची बचत होते. गेल्यावर्षीपेक्षा यंदा सोन्याचे भाव 28 टक्के वधारले आहेत.
शॅडो ट्रेडचे तुफान
दिल्लीतील ग्राहक अनुराग यांच्या मते लग्नासाठी सोने खरेदी केली. नगदीत खरेदी आणि कच्चा बिलाची ऑफर चागंली होती. या खरेदीत जवळपास 60 ते 70 हजार रूपयांची बचत झाली. हा मोठा फायदा होता. सोन्याच्या किंमती भडकल्या आहेत आणि सराफा व्यापाऱ्यावर विश्वास आहे. यामुळे शॅडो ट्रेडचे प्रचलन वाढले आहे. ग्राहक आणि सराफा व्यापाऱ्यांमधील ही देवाणघेवाण जुन्या काळापासून सुरू आहे. त्यात कच्चा बिलावर सोने खरेदी करण्यात येते. सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क दुप्पट केल्यापासून कच्चा बिलाला अधिक महत्त्व आले आहे. किरकोळ ग्राहकांना सोने आणि चांदी खरेदीवर 3 टक्के वस्तू आणि सेवा कर(GST) मोजावा लागतो.
इंधनानंतर सोन्याची सर्वाधिक आयात
भारतात इंधनानंतर सोन्याची सर्वाधिक आयात होते. व्यापारी तुटीत सोन्याचा मोठा वाटा आहे. जुलै महिन्यात ही तूट 32 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. हा एक उच्चांक आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना सोन्याचा मोह सोडण्याचे आवाहन केले आहे. भारतीयांनी सोने खरेदीपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. यामुळे परकीय चलन साठा वाचण्यास मदत होणार आहे.
