Pune Crime| नात्याला काळिमाफासणारी घटना ; चाकणमध्ये चुलत भावानेच केला अल्पवयीन बहिणीवर अत्याचार

कोरोना काळातल्या लॉकडाऊन दरम्यान आरोपी चुलत भावाने पीडित मुलीसोबत अश्लील वर्तन करत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने भीती पोटी कोणला याबाबतची माहिती दिली नाही. त्यानंतर आता नुकत्याच शाळा सुरु झाल्या. शाळेत गेल्यानंतर पीडित मुलीने आपल्या बाबतीत घडलेला सर्व प्रकार शाळेतील शिक्षिकेला सांगितला.

Pune Crime| नात्याला काळिमाफासणारी घटना ; चाकणमध्ये चुलत भावानेच केला अल्पवयीन बहिणीवर अत्याचार
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Apr 01, 2022 | 10:30 AM

पुणे – जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवर (Minor girl) सुरु असलेले लैंगिक अत्याचार सत्र अद्याप थांबलेले नाही. काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर  परिसरातील शाळेत ( School ) एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका घटना सामोर आली आहे. चाकण शहारातील उच्चभ्रु सोसायटीत बहिण भावाच्या नात्याला काळिंमा फासणारी घटना घडली आहे. एकत्र कुटुंबातील सख्ख्या चुलत भावानेच अल्पवयीन बहिणीवर अत्याचार (Sexual harassment)केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळं शहरात खळबळ निर्माण झाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चाकण पोलिसात तक्रार दिली आहे. घटनेतील आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

नेमकं काय झालं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे शाळा बंद होत्या. याच दरम्यान पीडित मुलगी तिच्या कुटुंबियांच्या सोबत वास्तव्यास होती. पीडित मुलीचे एकत्रित कुटुंब असून यामध्ये आरोपी चुलत भाऊही तिच्यासोबतच वास्तव्यास आहे.  कोरोना काळातल्या लॉकडाऊन दरम्यान आरोपी चुलत भावाने पीडित मुलीसोबत अश्लील वर्तन करत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने भीती पोटी कोणला याबाबतची माहिती दिली नाही. त्यानंतर आता नुकत्याच शाळा सुरु झाल्या. शाळेत गेल्यानंतर पीडित मुलीने आपल्या बाबतीत घडलेला सर्व प्रकार शाळेतील शिक्षिकेला सांगितला. मुलीने सांगितलेली घटना ऐकताच शिक्षिकेने मुलीच्या आईला शाळेत बोलावून घेतले. हा सगळा प्रकार मुलीच्या आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने चाकण पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीवर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केले आहेत. या घटनेतील आरोपी मुलगा फरार असून चाकण पोलीस त्याच शोध घेत आहे.

Pariksha Pe Charcha : ‘परीक्षा की बात, पीएम के साथ’, आज 11 वाजता पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद, असा पाहा संपूर्ण कार्यक्रम

मधुमेही आहात ? तर मग या पाच फळांपासून नेहमी लांब राहा

Zodiac | ”सुख म्हणजे नक्की हेच असतं” असंच म्हणाल, ग्रहांची स्थिती बदलणार, 3 राशींचे नशीब बदलून जाणार