IPS Krishna Prakash : आयपीएस कृष्ण प्रकाश उर्फ “आर्यनमॅन” यांची बदली, पोलीस दलात मोठी खांदेपालट

आयपीएस कृष्ण प्रकाश यांना आता विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही.आय.पी .सुरक्षा, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे धडेबाज पोलीस आयुक्त, आयर्नमन, अशी आयपीएस कृष्ण प्रकाश यांची ओळख आहे. त्यांच्या जागी अंकुश शिंदे (Ankush Shinde) हे पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारणार आहेत.

IPS Krishna Prakash : आयपीएस कृष्ण प्रकाश उर्फ आर्यनमॅन यांची बदली, पोलीस दलात मोठी खांदेपालट
आयपीएस कृष्ण प्रकाश उर्फ "आर्यनमॅन" यांची बदली
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 20, 2022 | 11:23 PM

मुंबई : राज्यातल्या पोलीस दलात आजचा दिवस अतिशय मोठा ठरलाय. वरिष्ठ पोलिसी अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आलीय. मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या (IPS Officer) बदल्या झाल्या आहेत. त्यात नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे, यांच्यापासून पिंपरी चिंडवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यापर्यंत बड्या अधिकाऱ्यांना दुसरीकडे धाडण्यात आलंय. पोलीस आयुक्त दीपक पांडे, सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) अशा डेकोरेटेड अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आयपीएस कृष्ण प्रकाश यांना आता विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही.आय.पी .सुरक्षा, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे धडेबाज पोलीस आयुक्त, आयर्नमन, अशी आयपीएस कृष्ण प्रकाश यांची ओळख आहे. त्यांच्या जागी अंकुश शिंदे (Ankush Shinde) हे पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारणार आहेत.

गुन्हेगारांना पकडण्याच्या स्टाईलची चर्चा

ते गुन्हेगारांना अद्दल घडवण्यात पटाईत असल्याच्याही बऱ्याच चर्चा होत्या कारण एका खून प्रकरणातील आरोपीला पकडताना त्यांनी केलेल्या एका कृतीची बरीच चर्चा होती. त्यांनी झाड फेकून मारल्याचा दावा चांगलाच चर्चेत होता.सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याचे धोरणही अनेकांना आवडले होते. त्यासाठी त्यांनी कृष्ण प्रकाश यांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक देखील सार्वजनिकरित्या सांगितला होता. त्यामुळे त्यांचा लोकसहभागही वाढला होता. मात्र काही कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना खटकल्याच्या चर्चा होत्या. काही वेळेला ते वेशांतर करून गुन्हेगाराला पकडण्यासाठी किंवा आपल्याच हद्दीतील पोलिसांचा कारभार पाहण्यासाठी पोहचत असे.

अनेकदा चर्चेत आणि वादात

दरम्यान, त्यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा आयुक्तालयात रंगली आहे. कृष्णप्रकाश हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या अनेक विशेष रुपांमुळे आणि वेशांतर करून पोहोचण्यामुळे ते चर्चेत होते. कृष्ण प्रकाश काही वेळेस चर्चेत तर काही वेळस वादात राहिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पिंपरी चिंचवडमध्ये आणल्याचेही बोलले जाते. अजित पवारांच्या आदेशाने कृष्णप्रकाश यांचा कारभार चालला असल्याच्याही अनेकदा चर्चा रंगल्या आहेत. सुरूवातील गुन्हेगारीला वचक बसणवणारे कृष्णप्रकाश पुन्हा का हतबल झाले आहेत, पुन्हा का गुन्हेगारी वाढू लागली, असे सावलही अनेकदा उपस्थित झाले आहेत.

OBC Reservation : ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा सुनावणी, यावेळेस आरक्षण टिकणार?

State Cabinet Decision : पुणे मेट्रो ते मोहफुलाची दारू… राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतल महत्वाचे 7 निर्णय, एका क्लिकवर

Gunratna Sadavarte Home CCTV: गुणरत्न सदावर्तेच्या घरातलं ‘त्या’ दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज समोर, पवारांच्या घरावर आंदोलन करणारे कॅमेऱ्यात कैद?