Maharashtra IPS Transfer : राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद भारंबे, कृष्ण प्रकाश, दीपक पांडेंचा समावेश

राज्यातील मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे, पिंपरी चिंडवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा समावेश आहे.

Maharashtra IPS Transfer : राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद भारंबे, कृष्ण प्रकाश, दीपक पांडेंचा समावेश
आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश, दीपक पांडेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 10:10 PM

मुंबई : राज्यातील मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या (IPS Officer) बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे, पिंपरी चिंडवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांचा समावेश आहे. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी काही दिवसांपूर्वीच बदलीची मागणी केली होती. घरगुती कारणांमुळे बदली करण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार आता त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नाशिक पोलीस आयुक्त म्हणून जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavre) यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे धडाकेबाज पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचीही बदली झालीय. त्यांच्या जागी आता अंकुश शिंदे हे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. कृष्ण प्रकाश यांची विशेष पोलीस महानिरीक्षक VIP सुरक्षा, मुंबई इथं बदली करण्यात आली आहे.

संदीप कर्णिक पुण्याचे नवे सह पोलीस आयुक्त

संदीप कर्णिक पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असताना माळवमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. त्या घटनेमुळं राज्याचं राजकारण हादरुन गेलं होतं. त्यानंतर संदीप कर्णिक यांची तातडीने बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता कर्णिक यांची पु्ण्याचे नवे सह पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना पदोन्नती देण्यात आलीय. त्यांच्या जागी सुहास वारके यांच्याकडे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सह पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

उस्मानाबादच्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांचीही बैदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता अक्षय शिंदे हे उस्मानाबादचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत.

सुरेश कुमार मेकला – विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे >> रविंद्र शिसवे – विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई >> विरेंद्र मिश्रा – अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई >> सत्य नारायण – विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा >> प्रवीणकुमार पडवळ – सह पोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे, बृहन्मुंबई >> एस. जयकुमार – विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई >> निशिथ मिश्रा – विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई. मोटार परिवहन विभाग >> सुनिल फुलारी – विशेष पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग, पुणे >> संजय मोहिते – विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई >> सुनिल कोल्हे – सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई >> दत्तात्रय कराळे – सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर >> प्रवीण आर. पवार – संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी, पुणे >> बी. जी. शेखर – विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक >> संजय बाविस्कर – विसेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे >> जयंत नाईकनवरे – पोलीस आयुक्त, नाशिक शहर

इतर बातम्या :

State Cabinet Decision : पुणे मेट्रो ते मोहफुलाची दारू… राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतल महत्वाचे 7 निर्णय, एका क्लिकवर

Gunratna Sadavarte : भारत माता की जय… आर्थर रोड कारागृहाबाहेर माध्यमांसमोर गुणरत्न सदावर्तेंची घोषणाबाजी!

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.