AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gunratna Sadavarte Home CCTV: गुणरत्न सदावर्तेच्या घरातलं ‘त्या’ दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज समोर, पवारांच्या घरावर आंदोलन करणारे कॅमेऱ्यात कैद?

हे आंदोलन होण्याआधी काही बैठका या सदावर्तेंच्या घरी आणि इमारतीच्या छतावर झाल्याचाही पोलिसांना संशय आहे. त्यामुळे इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमधून काही मिळेल का? याचाही शोध सुरू आहे.

Gunratna Sadavarte Home CCTV: गुणरत्न सदावर्तेच्या घरातलं 'त्या' दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज समोर, पवारांच्या घरावर आंदोलन करणारे कॅमेऱ्यात कैद?
आंदोलन करणारे सीसीटीव्हीत कैद?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 7:57 PM

मुंबई : गुणरत्न सदावर्तेंवर (Gunratna Sadavarte) राज्यात अनेक ठिकाणी केसेस दाखल होत असतानाच आता अनेक नव्या गोष्टी समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेरील आंदोलनाच्या तपासाला आणि सदावर्तेंच्या चौकशीला (St Worker Protest) वेग आणला आहे. सदावर्तेंच्या राहत्या इमरातीपासून ते राहत्या घरापर्यंत सध्या पोलीसांनी झाडाझडती सुरू केली आहे. अशात सदावर्तेंच्या घरी काही डायरी सापडल्याची माहिती समोर आली आहे. आणखीही काही महत्वाचे पुरावे गोळा करण्यात येत आहेत, अशात पोलिसांकडून सदावर्तेंच्या मोबाईलचीही तपासणी कसून सुरू आहे. त्यातूनही काही महत्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे. हे आंदोलन होण्याआधी काही बैठका या सदावर्तेंच्या घरी आणि इमारतीच्या छतावर झाल्याचाही पोलिसांना संशय आहे. त्यामुळे इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमधून काही मिळेल का? याचाही शोध सुरू आहे.

आंदोलन करणारे कॅमेऱ्यात कैद?

सदावर्तेंच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात आलंय. रात्रीच्या वेळी एक कर्मचारी टेरेसवर जाताना दिसत आहे. ज्या बैठका झाल्या होत्या त्याचे सीसीटीव्ही समोर आलेत, असे सांगण्यात ययेत आहे. तसेच आझाद मैदानात विजयी जल्लोष केल्यावर कर्मचारी आणि सदावर्ते घरी आल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहेत, त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे फक्त एका दिवसाच नाही तर अनेकवेळा कर्मचारी या ठिकाणी आल्याचे दिसत असल्याची माहिती देण्यात आली आहे. आता हे फुटेज सदावर्तेंचा पाय आणखी किती खोलात नेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अडचणी आणखी वाढल्या

एवढेट नाही तर सदावर्ते यांच्या घराची जागा ही बिल्डरने आराखड्यात हेल्थ सेंटर अशी दाखवली आहे. पण याच जागी राहती रूम तयार करण्यात आली, असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे सदावर्ते आणि हे बिल्डर या दोघांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.तर दुसरीकडे सदावर्तेवर राज्यात गुन्हे दाखल व्हायची मालिका जी मुंबईत सुरू झाली ती अजूनही थाबण्याचे नाव घेत आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात आता थेट एसटी कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केल्याचा प्रकार अकोल्यात समोर आला आहे. सदावर्तेविरोधात पहिला गुन्हा मुंबईत दाखल झाला. त्यानंतर हे प्रकरण अकोल्यापर्यंत पोहोचले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, बीड, अकोला, अशा अनेक ठिकाणी सदावर्तेविरोधात वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहे.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंची वकिली धोक्यात? कायदेज्ज्ञ म्हणतात बार काऊन्सिल सनद… 

Mumbai Police Guidelines : मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंग्यावर बंदी! सूत्रांची माहिती

Gunratna Sadavarte: कबुल, कबुल, कबुल! गुणरत्न सदावर्तेंनी 1, 44,00000 एवढे पैसे एस.टी. कर्मचाऱ्यांकडून घेतले? हिशेब वाचा

अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट
अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट.
सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का! जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार
सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का! जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार.
व्हायरल झालेल्या आजी-आजोबाशी खास बातचीत
व्हायरल झालेल्या आजी-आजोबाशी खास बातचीत.
नाराजीनाट्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
नाराजीनाट्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांचा विरोध; स्पष्टच सांगितल कारण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांचा विरोध; स्पष्टच सांगितल कारण.
गळा चिरून शेतात फेकलं, 14 वर्षीय मुलाच्या हत्येने जळगाव हादरलं
गळा चिरून शेतात फेकलं, 14 वर्षीय मुलाच्या हत्येने जळगाव हादरलं.
किंचाळ्या, खिडक्यांना लटकलेले विद्यार्थी अन्..
किंचाळ्या, खिडक्यांना लटकलेले विद्यार्थी अन्...
बीडमध्ये झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर
बीडमध्ये झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर.
लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-159 फ्लाईट रद्द, प्रवाशांनी व्यक्त केला
लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-159 फ्लाईट रद्द, प्रवाशांनी व्यक्त केला.
कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग
कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग.