उन्हाळी सुट्यांमध्ये IRCTC चे मस्त टूर पॅकेज, कुठे-कुठे घेऊन जाणार वाचा

IRCTC tour packages : उन्हाळाच्या सुट्यांमध्ये फिरण्यासाठी भारतीय रेल्वेची एजन्सी असलेल्या आयआरसीटीसीने टूर पॅकेज आणले आहे. यामध्ये आरक्षणापासून राहण्यापर्यंतची सर्व व्यवस्था असणार आहे. तीन श्रेणींमध्ये हे पॅकेज उपलब्ध केले आहे.

उन्हाळी सुट्यांमध्ये IRCTC चे मस्त टूर पॅकेज, कुठे-कुठे घेऊन जाणार वाचा
अयोध्या टूर पॅकेजImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 3:35 PM

पुणे : एप्रिल महिन्यात अनेक मुलांचा परीक्षा संपणार आहे. मग त्यानंतर मे महिन्यात कुठे-कुठे फिरता येईल, त्याचा आरखडा अनेक घरांमध्ये केला जात आहे. मग रेल्वेच्या आरक्षणापासून बुकींगपर्यंत अनेक गोष्टी कराव्या लागणार आहे. परंतु आता चिंता सोडा, भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ने तुमच्यासाठी मस्त योजना आणली आहे. आरक्षणापासून राहण्यापर्यंत सर्व व्यवस्था IRCTC करणार आहे. तीन वेगवेगळ्या श्रेणीमध्ये हे पॅकेज तयार करण्यात आले आहे.

काय आहे योजना

भारतात बारा ज्योर्तिलिंग आहेत. त्यापैकी पाच ज्योर्तिलिंग सोबत शिर्डी अन् शनीशिंगणापूर तुम्हाला करता येणार आहे. या पॅकेजमध्ये ओंकारेश्वर, महाकालेश्वर, सोमनाथ, नागेश्वर व नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तुम्हाला करता येणार आहे. २० मे पासून हे टूर पॅकेज सुरु होणार आहे. त्यासाठी विशेष रेल्वे असणार आहे. हा सर्व प्रवास भारत गौरव स्पेशल पर्यटक ट्रेनच्या माध्यमातून होणार आहे. या टूर पॅकेजला प्रारंभ कोलकाता येथून होणार आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे पॅकेज

आयआरसीटीसीचा हा टूर पॅकेज दहा दिवसांचा आहे. या पॅकेजमध्ये पाच ज्योर्तिलिंगसोबत स्टॅच्यू ऑफ युनिटी, शिर्डी साई मंदिर, शनी शिंगणापूरचे दर्शन करता येणार आहे. या पॅकेजचे बोर्डिंग व डिबोर्डिंग बंडेल, बर्द्धमान, बोलपूर, शांती निकेतन, रामपूर हाट, पाकुड, साहिबगंज, कहलगाव, भागलपूर, जमालपूर, किउल, बरौनी, समस्तीपूर, मुजफ्फरपूर, हाजीपूर, पाटलीपूत्र, आरा, बक्सर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्सन आणि प्रयागराज स्टेशनवरुन करता येणार आहे.

पॅकेजसाठी ईएमआय पर्याय

टूर पॅकेजसाठी आयआरसीटीसीने ईएमआयचा पर्याय दिला आहे. पॅकेजमध्ये इकोनॉमी क्लास (शयनयान श्रेणी), स्टँडर्ड (थर्ड एसी) आणि कंफर्ट (सेंकड एसी) क्लास उपलब्ध आहे. यामध्ये राहण्याची व खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इकोनॉमी क्लाससाठी 315 बर्थ असून त्यासाठी 20,060 रुपये आकारले जाणार आहे. या पॅकेजमध्ये नॉन एसी बजट हॉटेलमध्ये राहता येणार आहे. स्टँडर्ड श्रेणीत 31,800 रुपये द्यावे लागणार असून एसी हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे. कंफर्ट क्लासमध्ये 41,600 रुपये द्यावे लागणार असून एसी हॉटलमध्ये मुक्कम असणार आहे. पॅकेजसंदर्भात बुकिंगसाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर भेट द्या.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.