AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्यानं भरून घेतला ऑनलाइन फॉर्म अन् खात्यातून उकळले लाखो रूपये, पुण्यातला प्रकार

पीडित व्यक्तीने कॉल करणाऱ्यांची ओळख न पटवताच ते सांगतील त्या सूचनांचे पालन केले. त्याने फॉर्ममध्ये त्याच्या क्रेडिट कार्डचे सर्व तपशील उघड केले. यानंतर, फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्या कार्डचा तपशील वापरून एकूण 7.5 लाख रुपये 11 पैसे काढले.

Pune crime : क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्यानं भरून घेतला ऑनलाइन फॉर्म अन् खात्यातून उकळले लाखो रूपये, पुण्यातला प्रकार
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jun 15, 2022 | 4:42 PM
Share

पुणे : क्रेडिट कार्ड अपडेट (Credit card update) करण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक झाली आहे. येरवडा येथील एका सॉफ्टवेअर कंपनीच्या सहयोगी संचालकाची क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने ही फसवणूक (Cheating) करण्यात आली. या वर्षाच्या सुरुवातीला 7.5 लाख रुपयांची ही फसवणूक करण्यात आली होती. या आरोपावरून चतु:श्रृंगी पोलीस अहमदाबाद येथील एका व्यक्तीचा आणि बीडमधील त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात या दोघांनी बालेवाडी येथील रहिवासी असलेल्या पीडित व्यक्तीला एका बहुराष्ट्रीय बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगून फोन केले आणि आपले क्रेडिट कार्ड अपग्रेड करायचे आहे आणि तसे न झाल्यास ते ब्लॉक केले जाईल, असे सांगितले आणि त्याच्या बँक खात्यातून लाखो रुपये उकळले.

तीन महिन्यांपूर्वी दाखल केला अर्ज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीने तीन महिन्यांपूर्वी तक्रार अर्ज सादर केला होता आणि एक फोनही दिला होता, जो फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना तो डिजिटल व्यवहारासाठी दिला होता. फोनचे डिजिटल तपशील आणि क्रेडिट कार्ड तपशील तपासल्यानंतर, पोलिसांनी सोमवारी फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला.

उघड केले क्रेडिट कार्डचे तपशील

चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमधील पोलिसांच्या म्हणण्यानुसार, टेलिकॉलरने पीडित व्यक्तीला एक फोन आणि एक सिम कार्डदेखील पाठवले. ते बँकेचे धोरण असल्याचा दावा करत, आधीच अपलोड केलेला ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी त्याचा वापर करण्यास सांगितले. पीडित व्यक्तीने कॉल करणाऱ्यांची ओळख न पटवताच ते सांगतील त्या सूचनांचे पालन केले. त्याने फॉर्ममध्ये त्याच्या क्रेडिट कार्डचे सर्व तपशील उघड केले. यानंतर, फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्या कार्डचा तपशील वापरून एकूण 7.5 लाख रुपये 11 पैसे काढले.

बँकेचा तपशील मागितला

बीडमधील एका खासगी बँकेच्या खात्यात आणि नंतर अहमदाबादमधील दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आम्ही बँकेला पत्र लिहून दोन्ही खात्यांचा तपशील मागितला असून पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना ओळख पटल्याशिवाय तो करू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच