उद्धव ठाकरे नव्हे, या नेत्याने… तुरुंगातून सुटताच राऊतांना पहिला फोन कुणाचा? संजय राऊत यांचा मोठा खुलासा काय?

संजय राऊत यांनी तुरुंगातील अनुभवावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. पत्रा चाळ प्रकरणात तुरुंगातून सुटल्यावर त्यांना पहिला फोन राहुल गांधी यांचा आला होता, उद्धव ठाकरेंचा नव्हे, हा त्यांनी केलेला महत्त्वाचा खुलासा आहे. राहुल गांधींनी त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राऊतांना धीर दिला.

उद्धव ठाकरे नव्हे, या नेत्याने... तुरुंगातून सुटताच राऊतांना पहिला फोन कुणाचा? संजय राऊत यांचा मोठा खुलासा काय?
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 05, 2026 | 1:08 PM

ठाकरे गटाचे संजय राऊत हे काही काळ तुरुंगात होते. पत्रावाला चाळ प्रकरणात त्यांच्यावर कारवाई झाली होती. तुरुंगातील दाहक अनुभवावर त्यांनी पुस्तकही लिहिलं आहे. काल एका मुलाखतीत त्यांनी या आठवणींना पुन्हा उजाळा दिला. यावेळी त्यांनी तुरुंगातून अनेक नेत्यांना पत्र लिहिल्याचं सांगितलं. पण या नेत्यांना पत्र मिळालीच नसल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, तुरुंगातून सुटल्यावर त्यांना पहिला फोन उद्धव ठाकरे यांचा नव्हे तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आला होता. संजय राऊत यांनीच त्याबाबतची माहिती दिली आहे.

दिनमान साहित्य उत्सवात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि अमेय तिरोडकर यांनी राऊत यांना तुरुंगातील दिवसांबद्दल बोलतं केलं. राऊत यांनीही मनमोकळ्या गप्पा मारत, त्यावेळचे सर्व प्रसंग सांगितले. मी तुरुंगातून सुटल्यावर पहिला फोन मला राहुल गांधींचा आला होता. अनेकांचे फोन आले होते. पण प्रमुख नेत्यांपैकी पहिला फोन राहुल गांधींचा होता. राहुल गांधी यांची त्यावेळी भारत जोडो यात्रा सुरू होती. नांदेडला ही यात्रा आली होती. तेव्हा त्यांनी मला फोन केला. तुम्ही जे भोगलं त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. तुम्ही झुकला नाही हे बरं झालं. आता लोकांना धीर येईल. लोक त्यातून प्रेरणा घेतील. कुणालाही घाबरणार नाही, असा धीर राहुल गांधींनी दिला, असं राऊत म्हणाले.

राहुल गांधीच निर्विवाद नेते

राहुल गांधींची भाजपने जी बदनामी केली होती, त्यावरूनही त्यांनी हल्ला चढवला. राहुल गांधी राजकारणात आले, तेव्हा मोदी आणि त्यांच्या लोकांनी राहुल गांधींची बदनामी सुरू केली. त्यावेळी पहिल्यांदा मी म्हटलं, राहुल गांधी देशाचे नेते आहेत. ते देशाचं नेतृत्व करतील, असं मी म्हणालो होतो. राहुल गांधींना पप्पू बनवण्यासाठी या लोकांनी हजारो कोटी रुपये खर्च केले. 12 वर्षात 17 हजार कोटी रुपये खर्च केले होते. पण जेनजीने मोदींना एका क्षणात छोटा बंदर केलं. बिना पैशात. जंतरमंतरवरील दोन मुलींनी बिना पैशात डफली घेऊन बंदर बनवलं, असं सांगतानाच राहुल गांधी देशातील अनडिस्प्युटेड नेते आहेत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

मी बाळासाहेबांचा विश्वासू

सर्व पक्षीय संबंधावरही त्यांनी भाष्य केलं. मी शिवसेनेचा नेता, खासदार आहे. मी संपादक आहे. मी बाळासाहेबांचा विश्वासू माणूस आहे. माझी बाळासाहेबांवर जेवढी श्रद्धा आहे, तेवढी देवावर नाही. जेव्हा आपण राष्ट्रीय राजकारण करतो तेव्हा राष्ट्रीय राजकारण हे एक पक्षीय असतं नाही. माझ्या पक्षाचा विचार घेऊन इतर पक्षांसोबत संवाद ठेवला पाहिजे. फक्त मी राजकारणात राहिल असं होता कामा नये. हे मोदी आणि शाहांनी सुरू केलं हे घातक आहे. लोकशाहीत सर्वांनी राजकारण करण्याचा त्यांना अधिकार आहे. जे माझ्या विचाराचे नाहीत त्यांना दिमागी नक्षली म्हणता येणार नाही. नक्षलवादालाही एक विचार आहे. लोक हातात बंदूक का घेतात? तुम्हाला गांधीवर गोळी मारणारा चालतो. तुम्हाला बिल्किस बानूच्या खुन्यांना प्रतिष्ठा दिलेली चालते. हे दिमागी नक्षली नाही का? आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा ते दिमागी नक्षली? तरुण मुलं रस्त्यावर येतात ते दिमागी नक्षली. सर्व समावेशक राजकारण केलं तरच देश पुढे जाईल. नाही तर देशाची शकलं होतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us