AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पडळकर म्हणतात पुण्यातील गर्दीसाठी अजित पवारांवर गुन्हा नोंदवा, जयंत पाटील म्हणाले, दादांनी…

अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जमलेली गर्दी पक्षाच्या शहराध्यक्षांना चांगलीच महागात पडली. या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक करण्यात आली होती

पडळकर म्हणतात पुण्यातील गर्दीसाठी अजित पवारांवर गुन्हा नोंदवा, जयंत पाटील म्हणाले, दादांनी...
Jayant Patil, Ajit Pawar, Gopichand Padalkar
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jun 21, 2021 | 2:13 PM
Share

सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात गर्दी जमवल्याप्रकरणी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांना अटक करण्यात आली होती. संयोजकांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी थेट अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Jayant Patil reacts on Gopichand Padalkar demand to file FIR against Ajit Pawar for Pune NCP Office inauguration mob)

“अजित पवार पुण्याच्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या उद्घाटनासाठी गेले होते. अजित पवार गेल्यावर गर्दी झाली. त्यांचा नाईलाज झाला. अजितदादा सोशल डिस्टन्सिंगचं किती पालन करतात, हे त्यांनी उघड केलं आहे. अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही” असं जयंत पाटील म्हणाले.

शहराध्यक्षांना अटक आणि सुटका

अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जमलेली गर्दी पक्षाच्या शहराध्यक्षांना चांगलीच महागात पडली. या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक करण्यात आली होती. मात्र जामीन मिळताच त्यांची अवघ्या काही वेळात सुटकाही झाली. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी गर्दी जमवल्या प्रकरणी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश खुद्द अजित पवारांनीच दिले होते. जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांवर पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत जगतापांकडून दिलगिरी व्यक्त

पुढच्या काळात नियमांची पायमल्ली करणार नाही. सर्व नियम पाळू. गर्दी जमवल्या प्रकरणी आम्ही पुणे शहराची दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर कार्यालयाच्या उद्घाटनाला अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची झालेली गर्दी कोरोना नियमांची पायमल्ली करणारी होती. अजित पवारांच्या उपस्थितीत ही गर्दी झाल्यामुळे भाजप नेते त्यावर तुटून पडल्याचं पाहायला मिळालं. सर्वसामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश गेला. ही गर्दी अजितदादांच्या इमेजला धक्का देणारी ठरली. त्यामुळे अखेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

संयोजकांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी थेट अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. अजित पवार यांनी या गर्दीबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. अशा पद्धतीनं गर्दी करायला नको होती, असं अजितदादा म्हणाले होते.

अजित पवार गर्दीवर काय म्हणाले होते?

“मला प्रशांतने 10 तारखेला सांगितलं होतं की या कार्यक्रमाला भेट द्या, माझ्या स्वत:च्या मनामध्ये होतं की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कार्यालयाचं उद्घाटन करावं. पण सध्याचं एकंदरीत वातावरण, नियम, लोकांची उपस्थिती पाहता तसं केलं नाही. आम्ही लोकांची गर्दी होईल म्हणून सकाळी 7 वाजतादेखील उड्डाणपुलांचे उद्घाटन केलेली आहेत. अगदी तसंच सकाळी सातला उद्घाटन केलं असतं तर कार्यक्रमाला लोकं मर्यादित आली असती” असा दावा अजित पवार यांनी केला.

“गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला. मात्र कार्यकर्ते नाराज झाले असते. लोकांमध्येही नाराजी दिसली असती. मी प्रशांतला सांगितलं होतं की अतिशय साधेपणाने, नियमांचं तंतोतंत पालन करुन आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही जनतेला आवाहन करतो की, आपण नियमांचं पालन करा आणि मलाच एका कार्यक्रमात बोलवलं जात आणि इतक्या अडचणीत टाकलं जातं की धड धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही. अशी माझी अवस्था झाली आहे. त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो”, असं अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

अजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक आणि सुटका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, कोरोना नियमावली पायदळी तुडवली

जे मुख्यमंत्र्यांना जमले ते अजित पवारांना का नाही? आधी ‘ग्यान’ दिले, नंतर त्यालाच हरताळ?

(Jayant Patil reacts on Gopichand Padalkar demand to file FIR against Ajit Pawar for Pune NCP Office inauguration mob)

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा