जुन्नर बिबट्या सफारी वाद । शिवसेनेच्या माजी आमदराचे उपोषणनाट्य केवळ स्वतःच्या ‘राजकीय’ अस्तित्वासाठी , आमदार अतुल बेनकेची टीका

जुन्नर बिबट्या सफारी वाद । शिवसेनेच्या माजी आमदराचे उपोषणनाट्य केवळ स्वतःच्या 'राजकीय' अस्तित्वासाठी , आमदार अतुल बेनकेची टीका
अतुल बेनके यांची शिवसेनेच्या नेत्यांवर टीका
Image Credit source: TV9

त्यांचे उपोषणनाट्य म्हणजे स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी आहे.  जनतेची दिशाभूल व बुद्धीभेद करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP)नेत्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान आहे. आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्रितपणे सर्व शक्तीनिशी लढविणार आहेत

प्राजक्ता ढेकळे

|

Mar 28, 2022 | 1:05 PM

जुन्नर – जुन्नर तालुक्यात बिबट्या (leopard safari ) सफारीचा वाद अद्यापही मिटण्याचे नाव घेताना दिसत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके (MLA Atul Benke)यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली आहे. ‘ जुन्नरच्या शिवसेनेच्या माजी आमदाराला सध्या काही काम नाही. त्यांचे उपोषणनाट्य म्हणजे स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी आहे.  जनतेची दिशाभूल व बुद्धीभेद करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP)नेत्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान आहे. आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्रितपणे सर्व शक्तीनिशी लढविणार आहेत’ असे ते म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार बेनके बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा आदेश जुगाराला

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी करण्याचा निर्णय 21 मार्च 2022 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला. बिबट सफारीसाठी मी अधिवेशन काळात सहा वेळा पवार, ठाकरे यांच्या सोबत चर्चा केली आहे. असे असताना सध्या शिवसेनेत असलेल्या व पक्षनिष्ठा नसलेल्या माजी आमदारांनी बिबट सफारीच्या मागणीसाठी 22 मार्चपासून उपोषण सुरू केले. पर्यटन मंत्री ठाकरे यांनी उपोषण न करण्याचे आदेश देऊनही स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी साडेतीन दिवसांचे उपोषण केले,  असेही ते म्हणाले.

49 कोटी 93  लाख रुपयांचा निधी

राजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तालुक्यातील दहा कामांना 49कोटी 93 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या व्यतिरिक्त जुन्नर नगरपालिका हद्दीत विकास कामासाठी मागील तीन वर्षांत वीस कोटी रुपयांचा निधी, नारायणगाव येथील शंभर बेडच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी पन्नास कोटी, स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेसाठी एक कोटी, येडगाव येथील क्रीडा संकुलासाठी पाच कोटी, यशवंतराव चव्हाण पर्यटन विकासासाठी 9 कोटी 40  लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें