पंढरीत रंगणार कार्तिकीचा सोहळा ; उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक करणार महापूजा

कार्तिक एकादशीच्या निमित्तानं वारकरी पंढरपुरात जमायला सुरुवात झाली आहे. चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांनी राहुट्या उभारण्यास सुरुवात केली आहे. पंढरपूरला आलेला प्रत्येक वारकरी चंद्रभागेत स्नान करतो. याकाळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जीव रक्षक बोटी नदी पात्रात तैनात करण्यात आलेल्या आहेत.

पंढरीत रंगणार कार्तिकीचा सोहळा ; उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक करणार महापूजा
Kartik Ekadashi , Pandharpur
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 2:51 PM

पुणे- कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच पंढरपूर येथे कार्तिक एकादशीचा सोहळा रंगत आहे. उद्या होणाऱ्या कार्तिक एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून पूजेची तयारी पूर्ण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्निक श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची पूजा करणार आहेत.

उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार आहेत.

  • सकाळी या पहाटे 2 वाजून 15 मिनीटांनी अजित पवार मंदिरात दाखल होतील.
  • त्यानंतर पहाटे 2 वाजून 20 मिनीटांनी शासकीय महापूजेला सुरुवात होईल. 
  • पहाटे 3 वाजता रुक्मिणी मातेच्या पुजेला सुरुवात होवून ती ३ वाजून ३० मिनीटांपर्यंत ही पूजा चालेल.

त्यानंतर मंदिर समितीच्यावतीनं अजित पवारांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे व मंदिर समितीचे मोजके पदाधिकारी मंदिरात उपस्थित असतील.

दुसरीकडे कार्तिक एकादशीच्या निमित्तानं वारकरी पंढरपुरात जमायला सुरुवात झाली आहे. चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांनी राहुट्या उभारण्यास सुरुवात केली आहे. पंढरपूरला आलेला प्रत्येक वारकरी चंद्रभागेत स्नान करतो. याकाळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जीव रक्षक बोटी नदी पात्रात तैनात करण्यात आलेल्या आहेत. त्यात एकूण २५ जवान गस्त घालताना दिसून येणार आहेत. पाण्यात उतरताना अनेकदा पाण्याचा अंदाज न आल्याने भाविक पाण्यात बुडण्याचे प्रकार घडतात. या प्रकारांना आला घालण्यासाठी या बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

राजकारण पेटलेः 93 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का, चंद्रकांत पाटलांचा सवाल

भूमिहीन शेतकऱ्याच्या घरी जन्म, उच्च शिक्षणानंतर कार्पोरेट कंपनीत नोकरी, तरीही नक्षलवादी झाला; कोण आहेत मिलिंद तेलतुंबडे?

अमरावतीपाठोपाठ अकोल्यातील अकोटमध्येही संचारबंदी, दगडफेकीच्या घटनेनंतर तात्काळ निर्णय